कोपरगाव : विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा बूथ संपर्क अभियान रविवारी (दि.७) कोपरगाव येथे पार पडले. या अभियानात माजी आमदार स्नेहलता कोल्हे, तसेच निरीक्षक म्हणून असलेले कोपरगाव शहरचे प्रभारी अशोक पवार, ग्रामीणचे प्रभारी राजेंद्र सांगळे यांनी उपस्थितांना बूथ नियोजन, कार्यप्रणाली या संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष डी. आर. काले, महिला आघाडी शहराध्यक्ष वैशाली आढाव, अविनाश पाठक, रवींद्र पाठक, विनोद राक्षे, बबलू वाणी, रवींद्र रोहमारे, महावीर दगडे, किरण दगडे, सत्येन मुंदडा, राहुल सूर्यवंशी, दीपक चौधरी, पूनम देसाई, साखरबाई सोनवणे, संतोष देशमुख, मुकुंद काळे आदींसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचलन सुशांत खैरे यांनी केले. युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे यांनी आभार मानले.
भाजपचे बूथ संपर्क अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:22 IST