संगमनेर : भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीच्या वतीने सोमवारी (दि. ३०) शहरातील बसस्थानक परिसरातील दत्त मंदिरासमोर राज्यातील मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
आध्यात्मिक आघाडी शहर प्रमुख किरपाल डंग, ज्येष्ठ नेते राम जाजू, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर गुंजाळ, जिल्हा सचिव राजेंद्र सांगळे, तालुकाध्यक्ष अशोक इथापे, किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष सतीश कानवडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दिनेश सोमाणी, नगरसेविका मेघा भगत यांसह वैभव लांडगे, भरत फटांगरे, शैलेश फटांगरे, दीपेश ताटकर, कोंडाजी कडनर, हरीश वलवे, काशिनाथ पावसे, भारत गवळी, कल्पेश पोगुल, शिवाजीराव लष्करे, हरीश चकोर, रेश्मा खांडरे, अरुणा पवार, ज्योती भोर, प्राजक्ता बागुल, कांचन ढोरे, श्रीकांत कासट, दिलीप रावल, शिवकुमार भांगिरे, विकास गुळवे, जग्गू शिंदे, अरुण शिंदे, अमोल रणाते, सुमीत राऊत, प्रमोद भोर, सोमनाथ बोरसे, संजय वाकचौरे, विनायक भोईर, संजय बागले, बालाजी लालपोतू, सचिन मुके आदी यावेळी उपस्थित होते.
.................
फोटो नेम : ३१ भाजप आंदोलन
संगमनेर ओळ : राज्यातील मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली करण्याच्या मागणीसाठी संगमनेरातील दत्त मंदिरासमोर आंदोलन करताना भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते.