शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला सत्तेचा घमेंड; अण्णा हजारेंची टीका, जानेवारीत आंदोलन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 18:49 IST

जन आंदोलनाच्या तयारीसाठी देशभरातील प्रमुख कार्यकर्त्यांचे राळेगणसिध्दी येथे शनिवार व रविवारी शिबिर आयोजित करण्यात आले होते. सरकारला तीन महिने वेळ देऊन या काळात हजारे विविध राज्यात सभा घेऊन जनजागृती करणार आहेत.

ठळक मुद्देशेतक-यांकडून जे चक्रवाढ व्याज आकारलेले आहे, ते त्यांना परत करावेशेतक-यांनीच संघटित व्हायला हवे. सध्याच्या सरकारला सत्तेची घमेंड असून, त्यांनी जनतेची फसवणूक केली

पारनेर : लोकपाल, शेतकरी आंदोलन व निवडणूक सुधारणा इत्यादी मुद्द्यांवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली देशव्यापी जन आंदोलन सुरू करण्याचा निर्णय राळेगणसिद्धी येथे झालेल्या दोन दिवसीय शिबिरात घेण्यात आला. भाजपाला सत्तेचा घमेंड चढला आहे़ त्यामुळे ते कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत, असा आरोप अण्णांनी यावेळी केला़जन आंदोलनाच्या तयारीसाठी देशभरातील प्रमुख कार्यकर्त्यांचे राळेगणसिध्दी येथे शनिवार व रविवारी शिबिर आयोजित करण्यात आले होते. सरकारला तीन महिने वेळ देऊन या काळात हजारे विविध राज्यात सभा घेऊन जनजागृती करणार आहेत.समारोपप्रसंगी मार्गदर्शन करताना अण्णा म्हणाले, ग्रामसभा विधानसभा व लोकसभेची जननी आहे म्हणून ग्रामसभेला अधिकार मिळाले पाहिजेत. लोकप्रतिनिधी हे जनतेला जबाबदार असले पाहिजेत कारण त्यांना लोकांनी निवडून दिले आहे. दुर्दैवाने आज लोकप्रतिनिधी जनतेला नाही तर राजकीय पक्षाला जबाबदार आहेत. ही खरी लोकशाही होऊ शकत नाही. जन आंदोलनातून हे बदलावे लागेल. नोटा अधिकाराची व्याप्ती वाढवणे गरजेचे आहे. नोटाला सर्वाधिक मते मिळाली तर निवडणूक रद्द करून फेरनिवडणूक व्हावी व ज्यांना लोकांनी नाकारले आहे त्यांना पुन्हा उमेदवारी दिली जाऊ नये. शेतक-यांच्या प्रश्नावर सखोल विचार व्हावा. पीक कर्जावर कायद्याचे उल्लंघन करून मनमानी व्याज आकारले जाते. पीक विम्याच्या माध्यमातून शेतक-यांची लूट होते. बँक रेग्युलेशन कायद्याचे बँकांकडून पालन होत नाही. त्यामुळे शेतक-यांना आत्महत्या करण्याची वेळ येते. सर्वोच्च न्यायालयाने यावर स्पष्ट निर्देश दिले आहेत. तरीही शेतक-यांच्या प्रश्नावर विचार होत नाही हा अन्याय आहे. याविरोधात आंदोलन करावे लागेल. कार्यकर्त्यांनी या मुद्द्यावर जनजागृती करून आंदोलन करावे. आंदोलनाची मागणी राहील की, १९७२ पासून शेतक-यांकडून जे चक्रवाढ व्याज आकारलेले आहे, ते त्यांना परत करावे. शेतकरी हा सुद्धा देशाचा सेवक आहे. त्याला वयाच्या ६० वर्षांनंतर निवृत्तिवेतन मिळाले पाहिजे. संसदेत प्रलंबित असलेले शेतकरी पेन्शन विधेयक तत्काळ मंजूर करावे, औद्योगिक क्षेत्राला सर्व सोयीसुविधा देण्यात येतात. पण शेतक-यांना मात्र काहीच दिले जात नाही. यावर शेतक-यांनीच संघटित व्हायला हवे. केवळ स्तर पाच व सहामधील जमिनीचे क्षेत्र विकासकामांसाठी अधिग्रहित करायला हवे. ते करताना ग्रामसभेची परवानगी बंधनकारक असायला हवी. मंत्रालयात बसून शेतक-यांच्या जमिनी संपादित करणे हे अन्यायकारक आहे. हे थांबविण्यासाठी आंदोलनाची गरज आहे. शेतक-यांचे प्रश्न सोडवायचे असतील, तर शेतक-यांना संसदेत पाठवावे लागेल. त्यासाठी शेतक-यांना जागवावे लागेल, असे अण्णा म्हणाले.कार्यकर्त्यांनी चारित्र्य सांभाळणे आवश्यक आहे. केवळ सत्ता परिवर्तन करून काही साध्य होणार नाही. जनआंदोलनातून व्यवस्था परिवर्तन करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. सध्याच्या सरकारला सत्तेची घमेंड असून, त्यांनी जनतेची फसवणूक केली असल्याचे हजारे म्हणाले. कार्यकर्त्यांनी संविधानाचा अभ्यास करायला हवा. लोकशिक्षण करायला हवे. परिवर्तन घडवून आणायचे असेल, तर संघटित होऊन व्यापक आंदोलन करावे लागेल. न्यासाचे प्रा. बालाजी कोंपलवार, अशोक सब्बन, अल्लाउद्दीन शेख, अजित देशमुख इत्यादींनी चर्चेत सहभाग घेतला. राळेगणसिद्धीच्या सरपंच रोहिणी गाजरे यांनी आभार मानले.