शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण क्षेत्रात भाजप सरकारचा अनागोंदी कारभार - बाळासाहेब थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 16:09 IST

भाजप सरकार व प्रशासन यांच्यात सुसंवाद नसून नागरिकांबरोबरच शेतकरी व शिक्षकांमध्ये मोठे असंतोषाचे वातावरण आहे.

संगमनेर : भाजप सरकार व प्रशासन यांच्यात सुसंवाद नसून नागरिकांबरोबरच शेतकरी व शिक्षकांमध्ये मोठे असंतोषाचे वातावरण आहे. शिक्षण क्षेत्रातील भाजपा सरकारचा अनागोंदी कारभार थांबविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, टीडीएफ व मित्र पक्षांचे उमेदवार संदीप बेडसे हे शिक्षकांच्या हक्कासाठी लढणारे योग्य व्यक्तीमत्व असून आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत. असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.शुक्रवारी जिल्हा सहकारी बँकेच्या संगमनेर शाखेच्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकार सभागृहात झालेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी व टीडीएफ यांच्या संयुक्त शिक्षक मेळाव्यात आमदार थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे होते. व्यासपीठावर उमेदवार संदीप बेडसे, टीडीएफचे हिरालाल पगडाल, शिवाजी थोरात, चंद्रकांत कडलग, आर.बी. राहाणे, लक्ष्मण कुटे, भाऊसाहेब कुटे, सतिष कानवडे, राष्ट्रवादीचे कपील पवार, प्रशांत वामन, दिलीप शिंदे, केशव मुर्तडक, संपत डोंगरे, शंकर खेमनर, दत्तात्रय जोंधळे, रजिस्ट्रार बाबुराव गवांदे यांसह मान्यवर उपस्थित होते.आमदार थोरात म्हणाले, भाजप सरकारचा प्रशासनावर अंकुश नसल्याने सगळीकडेच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपा सरकाराला अजूनही जनतेचे प्रश्न कळले नाही. त्यामुळेच शेतकरी, व्यापारी, सामान्य नागरिक त्रस्त आहे. सरकार दुधाला प्रतिलिटर २७ रूपये भाव जाहिर करते. मात्र, प्रत्यक्षात १६ रूपये देते. शिक्षण क्षेत्रातही असंतोषाचे वातावरण आहे.संदीप बेडसे हे कामाचे व सकारात्मक वृत्ती असलेले पुरोगामी विचार जोपासणारे आहेत. संगमनेर तालुका हा पुरोगामी विचारांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असून संदीप बेडसे हे नक्कीच विजयी होऊन शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यात अग्रेसर असतील असा विश्वासही आमदार थोरात यांनी व्यक्त केला.आमदार डॉ. तांबे म्हणाले, केंद्र व राज्य सरकार हे शिक्षण क्षेत्र उद्धवस्त करु पाहत आहे. सहकार व शिक्षण ही बहुजनांची बलस्थाने आहेत. शिक्षण क्षेत्रात वाईट प्रवृत्ती वाढू नयेत यासाठी सर्वांनी काम करणे गरजेचे आहे. शिक्षक हा फक्त वगार्पुरता मर्यादित नसून तो समाजसुधारक आहे. म्हणून या क्षेत्रातील तत्परता, विनम्रता राखण्यासाठी सर्वांनी टीडीएफच्या उमेदवारांना पाठींबा द्यावा असे आवाहन त्यांनी केले.यावेळी प्राचार्य डॉ. आर. के. दातीर, प्रा. व्ही. बी. धुमाळ, डॉ. एम. ए व्यंकटेश, बी. के. शिंदे, बाबा लोंढे, एस. टी. देशमुख, सुभाष सांगळे, भारत वर्पे, दत्तु खुळे, मिलींद औटी, अ‍ॅड. सुहास आहेर, अ‍ॅड. अनिल गोडसे आदि उपस्थित होते. प्रास्ताविक सचिन फटांगरे यांनी केले. सुत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. जिजाबा हासे यांनी आभार मानले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात