शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपकडून दबावतंत्राचा वापर-बाळासाहेब थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 12:27 IST

भाजप सरकार राजकारण करताना सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) वापर करीत आहे. अनेकांना नोटीस पाठवून त्रास दिला जातो आहे. देशातील ज्येष्ठ नेते असलेले राष्टवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील नोटीस पाठविल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. राजकारणात या पाच वर्षात आलेली ही पध्दत चुकीची आहे. भाजप सरकारकडून दबाव तंत्राचा वापर केला जातो आहे, असा आरोप कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला. 

संगमनेर : भाजप सरकार राजकारण करताना सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) वापर करीत आहे. अनेकांना नोटीस पाठवून त्रास दिला जातो आहे. देशातील ज्येष्ठ नेते असलेले राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील नोटीस पाठविल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. राजकारणात या पाच वर्षात आलेली ही पध्दत चुकीची आहे. भाजप सरकारकडून दबाव तंत्राचा वापर केला जातो आहे, असा आरोप कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला.  शुक्रवारी संगमनेरात आयोजित पत्रकार परिषदेत कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात बोलत होते. ते म्हणाले, राजकारण करताना केंद्रीय पातळीवरील संस्थांचा उपयोग केला जातो आहे. भाजप सरकार हेच करते आहे. राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ईडीची नोटीस पाठविण्यात आली. यातील राजकारण सर्वसामान्य जनतेला समजते. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी त्यांचा काहीही संबंध नसून ते बॅँकेचे कधी सभासद अथवा पदावर देखील नव्हते. पवारांनी पन्नास वर्षे राज्याच्या, देशाच्या संसदीय कार्यात सहभाग घेतला. महत्वाची पदे त्यांनी सांभाळली. केंद्रात, राज्यात कृषी क्षेत्रात त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतले असून प्रत्येक कुटुंबापर्यंत त्यांचे कार्य पोहोचले आहे. दौºयावर असताना त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला. त्यातूनच त्यांना सक्तवसुली संचालनालयाची नोटीस पाठविण्यात आली. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे सर्व सुरू आहे. भाजपात प्रवेश केलेल्या कुठल्याही लोकांना नोटीस पाठविली गेलेली नाही. अशी अनेक उदाहरणे आहेत. राजकारण करताना भाजपचे धोरण चुकीचे असून लोकशाही मानणाºया सर्व घटकांनी याचा निषेध केला पाहिजे, असेही कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात म्हणाले. 

टॅग्स :PoliticsराजकारणAhmednagarअहमदनगर