जामखेड : येथील महेश मसाळ यांची भारतीय जनता पार्टी युवामोर्चा जिल्हा दक्षिण चिटणीसपदी निवड व नान्नजच्या सुरेखा आरुन कोळपकर यांची जामखेड तालुका महिला संघटन सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा पंचायत समितीमध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य डाॅ.भगवान मुरुमकर, जवळा गटाचे जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, युवामोर्चा तालुकाध्यक्ष शरद कार्ले, ज्ञानेश्वर माउली अंदुरे, अरणगावचे सरपंच अंकुश शिंदे, मनिषाताई मोहोळकर, अनिता कुलकर्णी, संभाजी मुळे, राहुल चोरगे, सुरेश ढवळे, आबा ढवळे, फक्राबादचे माजी सरपंच दिगांबर ढवळे, जातेगावचे उपसरपंच भाऊसाहेब गायकवाड उपस्थित होते.
(फोटो - भाजपच्या नूतन पदाधिकारी यांच्या निवडीनिमित्त पंचायत समितीत सदस्य डॉ.भगवान मुरुमकर यांनी महेश मासाळ यांचा सत्कार केला.)