शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

भाजपा महसूलमंत्र्यांच्या पाठीशी

By admin | Updated: May 18, 2016 23:59 IST

संगमनेर : महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना जेलमध्ये पाठविण्याची अंजली दमानिया यांची भाषा म्हणजे सवंग लोकप्रियतेसाठी केलेले विधान आहे.

संगमनेर : महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना जेलमध्ये पाठविण्याची अंजली दमानिया यांची भाषा म्हणजे सवंग लोकप्रियतेसाठी केलेले विधान आहे. काम करताना हित साधले गेले नाही की, हितचिंतकांकडून आरोप होतात. त्यात काहीही तथ्य नाही. त्यामुळे भाजपा खडसे यांच्या पाठिशी भक्कमपणे उभी आहे, अशा शब्दात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी खडसे यांची पाठराखण केली.बुधवारी सायंकाळी एका खासगी कार्यक्रमानिमित्त संगमनेरात आले असता शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी ते बोलत होते. महाराष्ट्रात सत्तेवर आलेले भाजपा-शिवसेनेचे सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. दानवे म्हणाले, शासकीय जमीन कोणत्याही संस्थेला न देण्याचा निर्णय झाला आहे. खासगी पातळीवर शिजलेले हे प्रकरण आधीच फेटाळले गेले असून त्यात काहीही तथ्य नाही. भाजपा मंत्र्यांवर यापूर्वी अनेक आरोप झाले. परंतु एकही सिद्ध होऊ शकला नसल्याचा खुलासा दानवे यांनी केला. भाजपा-सेनेच्या शीतयुद्धावर भाष्य करताना दानवे यांनी दोन्ही पक्षांची युती अभेद्य आहे. त्यामुळे युती सरकार पाच वर्षे कुठलीही चिंता न करता टिकेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)