पारनेर : वीज बिल वाढीमुळे महावितरणच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने पारनेर येथील महावितरण कार्यालयावर शुक्रवारी सकाळी अकरा वाजता हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.
तालुकाध्यक्ष वसंत चेडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. कोरोना काळात संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर झालेला होता. याचा फायदा घेऊन महावितरण वीज कंपनीने नागरिकांना अंदाजे बिल टाकून त्याचे वाटप केले. ही बिले तीन ते चार महिन्यांची एकत्रित असल्यामुळे त्याचा आपोआपच बोजा नागरिकांवर आला. लॉकडाऊनच्या काळात अनेक नागरिकांचे हातचे काम गेले, अनेक नागरिक बेरोजगार झाले. त्यातच महावितरण वीज कंपनीचा हा दंडेलशाहीचा कार्यक्रम चालू असल्याची भावना यावेळी चेडे यांनी व्यक्त केली.
यावेळी तालुकाध्यक्ष वसंत चेडे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे, तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब हरिभाऊ चेडे, रघुनाथ आंबेडकर, बबन डावखर, संभाजी आमले, आप्पासाहेब दुधाडे, चंद्रकांत सोबले, संभाजी आंबेडकर, कैलास सोंडकर, सुनील म्हस्के, दादाभाऊ दुधाडे आदी उपस्थित होते.