नेवासा : दूध दरवाढीसाठी बुधवारी (२२ जुलै) सकाळी भाजपातर्फे गणपती मंदिर चौकातील गणपतीला दुग्धाभिषेक घालून रस्त्यावर दूध ओतून आंदोलन केले. यावेळी सरकारच्या निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या.
माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व तालुकाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले. तालुक्यातील दूध उत्पादक शेतक-यांच्या गायीच्या दुधाला सरसकट १० रुपये अनुदान द्यावे, प्रती लिटर दुधाला ३० रुपये खरेदी दर द्यावा, या मागणीचे निवेदन तहसीलदार रुपेश सुराणा यांना देण्यात आले. राज्य सरकारने याबाबत तोडगा न काढल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी शहराध्यक्ष मनोज पारखे, युवा मोर्चाचे निरंजन डहाळे, नगरसेवक सचिन नागपुरे, उदयकुमार बल्लाळ, राजेंद्र मापारी, सतीश गायके, आकाश देशमुख, सुभाष पवार, प्रतीक शेजूळ, मारुती आलवणे, दत्तात्रय वरुडे, रमेश घोरपडे, विवेक नन्नवरे, भारत डोकडे, आबा डौले, संतोष डौले, भास्कर कणगरे, आदिनाथ पटारे उपस्थित होते.