तिसगाव : श्री क्षेत्र हनुमान टाकळी (ता. पाथर्डी) येथील भूमिपुत्र व पाथर्डी तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक सुभाष बर्डे यांनी वाढदिवसानिमित्त समर्थ हनुमान मंदिर परिसरात बहुउपयोगी ५११ झाडे लावली. ठिबक सिंचनाची सुविधा झाडांना करून त्यांनी या झाडांचे संवर्धनाचा संकल्प केला.
ग्रामस्थ भाविकांपैकी इच्छुक असणाऱ्यांचे वाढदिवस ही मंदिर प्रांगणात वृक्षारोपण करून सामूहिक स्वरुपात साजरे केले जातील, असे देवस्थान समितीचे वतीने प्रसंगी जाहीर करण्यात आले. यावेळी सुभाष बर्डे, समर्थ हनुमान देवस्थानचे अध्यक्ष रमेशआप्पा महाराज अध्यक्षस्थानी होते. खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाळासाहेब अकोलकर, वृद्धेश्वरचे संचालक कुशीनाथ बर्डे, सरपंच सुनीता शिरसाठ, संतोष शिंदे, अमोल वाघ, जिजाबा लोंढे, सेवा संस्थेचे अध्यक्ष पोपटराव कराळे, अशोकराव काजळे, युवा नेते चारुदत्त वाघ, आप्पासाहेब राजळे आदी उपस्थित होते. किशोर बडबडे, प्रवीण शिरसाट, गणेश गायकवाड, ग्रामसेवक प्रमोद म्हस्के, सुरेंद्र बर्डे, सेवा संस्थेचे उपाध्यक्ष संजय डमाळ, सचिव बाळासाहेब ताठे, प्रदीप दळवी, संजय बर्डे आदींसह ग्रामस्थ हजर होते.