शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

विखे यांनी घेतले आत्महत्याग्रस्त २०८ कुटुंबांना दत्तक

By admin | Updated: June 4, 2017 16:46 IST

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी स्व़ पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील सहाय्यता योजना हाती घेण्यात आली असून

आॅनलाईन लोकमतअहमदनगर, दि़ ४ - आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी स्व़ पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील सहाय्यता योजना हाती घेण्यात आली असून, जिल्ह्यातील २०८ शेतकरी कुटुंबांना दत्तक घेण्यात आले आहे़ विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या १५ जून रोजी या योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे़ कुटुंबातील मुलींचे लग्न, शिक्षण आणि कुटुंबातील एकास नोकरी आणि उपचाराची जबाबदारी विखे परिवार घेत असल्याचे विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ़ सुजय विखे यांनी सांगितले़ मराठा क्रांती मोर्चाला मिळालेल्या निधीतून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी ५० हजार रुपये मदतीची भावना त्यावेळी समन्वय समितीच्या सभेत व्यक्त केली होती़ परंतु, त्यास विरोध झाला़ तेव्हापासून आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना मदत करण्याचा विचार होता़ युतीच्या काळात नोव्हेंबर २०१४ पासून आजपर्यंत जिल्ह्यातील २०८ शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्या़ त्यापैकी १७० सरकारी मदतीला पात्र ठरले़ गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांच्या घरी जावून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या़ ही कुटुंब अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत़ सरकारच्या संजय गांधी योजनेसारख्या योजनेचा लाभ देखील त्यांना मिळत नाही़ एवढेच नव्हे तर या कुटुंबाची सरकारी यंत्रणेकडून साधी विचारपूसदेखील केली गेली नाही, हे वास्तव आहे़ केवळ आर्थिक मदत देवून आपली जबाबदारी संपणारी नाही़ त्यांना आधार देवून मुख्य प्रवाहात आणावे लागेल, त्यादृष्टीने दोन महिने अभ्यास केला़ त्यातून या कुटुंबाना सक्षम करण्याची गरज असल्याचे समोर आले़ समाजाचे आपण काही देणे लागतो, या भावनेतून मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा ४० लाखांचा प्रिमियम दरवर्षी भरतो़ त्यातून शेतकऱ्यांना ९० लाखांची मदत झाली़ पद्मभूषण स्व़ बाळासाहेब विखे यांनी कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी लढा दिला़ शेतकऱ्यांसाठी त्यांची नेहमीच तळमळ असायाची़ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आधार, हीच त्यांना श्रध्दांजली ठरू शकते़ त्यांच्याच नावाने प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरू करून पुढे ती व्यापक बनविण्याचा प्रयत्न असल्याचे विखे म्हणाले़        योजनेची वैशिष्ट्ये

  • मुला-मुलींना पदवीपर्यंतचे शिक्षण देणार
  • मुलींच्या लग्नाचा खर्च दिला जाणार
  • कुटुंबातील एकाला शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी
  • आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नींना
  • उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देणार
  • कुटुंबातील व्यक्तींना आजीवन मोफत उपचार
  • मोफत विमा योजना