शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘बिहार पॅटर्न’ने जगविली तीनशेहून अधिक झाडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 16:34 IST

भर उन्हाळ्यात अकोले तालुक्यातील जामगाव येथील ‘बिहार पॅटर्न’ अंतर्गत करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीतील तीनशेहून अधिक झाडे आजही हिरवीगार आहेत.

राजूर : भर उन्हाळ्यात अकोले तालुक्यातील जामगाव येथील ‘बिहार पॅटर्न’ अंतर्गत करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीतील तीनशेहून अधिक झाडे आजही हिरवीगार आहेत. पाणी टंचाईची समस्या भेडसावत असतानाही ग्रामपंचायत आणि रोजगार सेवक यांच्या योग्य नियोजनामुळे हरितग्रामकडे वाटचाल करत असलेला जामगाव येथील उपक्रम इतर गावांना दिशादायक ठरेल असाच आहे.दोन वर्षांपूर्वी अकोले पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत जामगाव येथे या उपक्रमांतर्गत गावातील रस्त्याच्या दुतर्फा करंज, शिसव, काशीद, बदाम, बॉटल पंप व काही शोभेची अशी विविध प्रकारची चारशे झाडे लावण्यात आली. या झाडांची देखभाल करण्यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत दोन व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली आहे.सुरवातीला या झाडांना शेणखत देण्यात आले, यानंतर नियमितपणे पाणी घालणे,झाडांच्या संरक्षनासाठी कूंपण तयार करणे, आळे तयार करून त्यातील तन काढणे आदी कामे या अंतर्गत येत असतात.गावातील सुरवातीपासून ते शेवटच्या टोकापर्यंत व गावअंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा काही झाडे लावण्यात आली आहेत. यातील काही झाडांची मर झालेली असली तरी चारशे पैकी तीनशे चाळीस झाडे आजही हिरवीगार आहेत.शेवटच्या टोकाला लावण्यात आलेली झाडे मुरमाड जागेवर असल्याने त्यांची वाढ काहीशी कमी आहे. मात्र गावातील झाडांची वाढ चांगली झाली आहे. पावसाळ्यापूर्वी या झाडांना शेणखत टाकणे, आळे हलवून घेणे आदी करावयाचे कामांची माहिती रोजगार सेवक यांना दिली आहे.त्यामुळे अखेरच्या टप्प्यातील वर्षात या झाडांची वाढ चांगली होईल, असा आशावाद पंचायत समितीच्या कृषी विभागाचे विस्तार अधिकारी डी. बी. कोकतरे यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले