शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोतूळमधील मोठे देवबाबा मंदिर महिलांसाठी खुले

By admin | Updated: May 31, 2017 13:21 IST

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी महिला कार्यकर्त्यांसह मोठे देवबाबा मंदिरात प्रवेश करून दीडशे वर्षांपूवीची परंपरा मोडीत काढून महिलांना मंदिर प्रवेश खुला केला.

लोकमत न्यूज नेटवर्क

कोतूळ (अहमदनगर) : भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी महिला कार्यकर्त्यांसह मोठे देवबाबा मंदिरात प्रवेश करून दीडशे वर्षांपूवीची परंपरा मोडीत काढून महिलांना मंदिर प्रवेश खुला केला. सोमवारी तृप्ती देसाई व महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत परिवर्तनाचे पाऊल टाकले. मंदिर व्यवस्थापन समितीनेही या निर्णयाचे स्वागत करत महिलांचा सन्मान केला. यावेळी अ?ॅड. मंगला हांडे, रेखा दिवटे, सविता निमसे, शाहनाज शेख, सिस्टर पठारे, रंजना झोळेकर, सविता भालेकर, प्रीतम हांडे, जिल्हा परिषद सदस्य रमेश देशमुख,  के. बी. हांडे, सोमदास पवार, दिनकर पवार, राजेंद्र आरोटे, गौतम रोकडे, निरंजन देशमुख, तौसिफ पठाण, रवींद्र घाटकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.मोठे देव बाबा मंदिरात मंदिरात महिलांना प्रवेश बंदी असल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी मंदिरात प्रवेश करायचे निश्चित केले होते. या नियोजनानुसार सोमवारी सकाळी अकरा वाजता देसाई यांच्यासह महिला कार्यकर्त्यां कोतूळमध्ये दाखल झाल्या. स्री-पुरुष समानतेच्या घोषणा देत महिलांनी मंदीरात प्रवेश करुन मोठे देवबाबाचे दर्शन घेतले. याबाबत मंदिर व्यवस्थापन समितीने कोणतीही हरकत न घेता त्यांचे स्वागत केले. मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमदास पवार यांनी देसाई यांनी सर्व महिलांचा सत्कार केला. व्यवस्थापन समितीने स्वत पुढाकार घेत महिला प्रवेश बंदीचा फलक काढून टाकला. देसाई यांनी गावक-यांच्या पुरोगामी विचाराचे स्वागत केले. मंदिर खुले केल्यानंतर देसाई यांनी कोतुळ ग्रामपंचायतला भेट दिली. सरपंच अनुसया धराडे, उपसरपंच सविता खरात यांनीही त्यांचा सत्कार केला. पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, उपनिरीक्षक नितीन बेंद्रे यांनी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता.