शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

मानवसेवा प्रकल्पात स्वच्छतागृहाचे भूमिपूजन

By | Updated: December 8, 2020 04:18 IST

अहमदनगर : समाजातील निराधार, वंचित मनोरुग्णांना मायेने आधार देणाऱ्या अरणगाव येथील अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पास रेलफोर फाऊंडेशन,पुणे यांच्या ...

अहमदनगर : समाजातील निराधार, वंचित मनोरुग्णांना मायेने आधार देणाऱ्या अरणगाव येथील अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पास रेलफोर फाऊंडेशन,पुणे यांच्या आर्थिक सहयोगातून सुसज्ज स्नानगृह व स्वच्छतागृह उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाचे भूमिपूजन रेलफोर फाऊंडेशनचे व्यवस्थापक नितीन घोडके यांच्या हस्ते झाले.

यावेळी पुणे येथील सेवादीप प्रकल्पाच्या किशोरी अग्निहोत्री, आदिवासी विकास विभाग शासकीय माध्यमिक आश्रमशाळेचे (पळशी) अधीक्षक भाऊसाहेब पटेकर, सोनेवाडीचे उपसरपंच नितीन दळवी, सदस्य नंदू दळवी, एकनाथ सातदिवे, कल्याण मुठे, रमेश गुंजाळ, विनोद कुसळकर, अंबादास शिंगारे, चांगदेव कापसे आदी उपस्थित होते.

संस्थेचे प्रमुख दिलीप गुंजाळ म्हणाले, अमृतवाहिनी संस्थेचे मानवसेवा प्रकल्प बेवारस मनोरुग्णांसाठी हक्काचे घर बनले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ३० मनोरुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर सहाशेपेक्षा जास्त मनोरुग्णांवर उपचार केले आहेत. त्यांचे कुटुंब शोधून पुनर्वसन करण्यात आले आहे. यावेळी रेलफोर फाऊंडेशनच्या वतीने मानवसेवा प्रकल्पाला कॉट, गादी, बेडशीट आदि गरजेचे साहित्य देण्यात आले.

मानवसेवा प्रकल्पात ३० बेवारस पुरुष व महिलांवर उपचार सुरू असून, त्यांच्या स्वच्छता व स्नानगृहाची मोठी अडचण निर्माण झाली होती. ही अडचण लक्षात घेऊन सदर प्रश्‍न पुणे येथील रेलफोर फाऊंडेशनने सोडविल्याबद्दल मानवसेवा प्रकल्पाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रसाद माळी, सोमनाथ बर्डे, राहुल साबळे, सुशांत गायकवाड, मनीषा ठोसरे, अशोक मदणे, अजय दळवी, कृष्णा बर्डे, अनिता मदणे, अंबादास गुंजाळ सिराज शेख आदी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

--