शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

माऊली मिशनच्या केअर सेंटरचे मंगळवारी भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:16 IST

अहमदनगर : नगर-शिर्डी रोडवरील शिंगवे येथील माऊली मिशनतर्फे स्व. दादा धामणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ डिम्नेशिया व अल्झायमर्स केअर सेंटरचे भूमिपूजन ...

अहमदनगर : नगर-शिर्डी रोडवरील शिंगवे येथील माऊली मिशनतर्फे स्व. दादा धामणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ डिम्नेशिया व अल्झायमर्स केअर सेंटरचे भूमिपूजन पद्मश्री डॉ. रवींद्र व स्मिता कोल्हे यांच्या हस्ते २९ डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता होणार असल्याची माहिती डॉ. राजेंद्र व डॉ. सुचेता धामणे यांनी दिली.

याबाबत दिलेल्या पत्रकात डॉ. धामणे यांनी म्हटले आहे की, रस्त्यावरील निराधार, बेघर व बेवारस मनोरुग्ण व गंभीर शारीरिक आजारी माता-भगिनींचे कायमस्वरूपीचे घर असलेल्या माऊलीच्या वाय. एस. साने इंद्रधनू प्रकल्पात व नवीन मनगाव प्रकल्पात सध्या ३२५ माता-भगिनी व येथेच जन्मलेली त्यांची ३० मुले कायमस्वरूपी राहत आहेत. रस्त्यावरून माऊलीच्या घरात येणाऱ्या अनेक माता कधीकधी गंभीर शारीरिक आजारी असतात. त्यांच्यासाठी माऊलीमध्ये स्वतंत्र अतिदक्षता विभागही असून, मरणासन्न अवस्थेत असलेल्या अनेक वयस्क मातांना शेवटपर्यंत उपचार देऊन काळजी घेतली जाते.

दिवसेंदिवस या कामाचा व्याप वाढत असल्याने व डिमेन्शिया व अल्झायमर्सग्रस्त वयस्क माता-भगिनींची संख्या वाढते आहे. बऱ्याचदा अशा महिलांना नातेवाईक रस्त्यावर किंवा धार्मिकस्थळी मरण्यासाठी सोडून निघून जातात. स्मृतिभ्रंश झालेला असल्याने त्यांना काहीही आठवत नाही. अशा वेळी त्यांना वेगळ्या आणि त्यांच्या आजारानुकूल वातावरणाची व सोयीसुविधांची आवश्यकता असते. त्यांचे संगोपन व शेवटपर्यंतचे उपचार योग्य व अधिक चांगले होण्यासाठी माउली मिशन या विशेष प्रकल्पाचे नियोजन करीत आहे. माउलीचे अध्वर्यू स्व. बा. ग. तथा दादा धामणे यांच्या स्मृती सेवेच्या रूपाने कायमस्वरूपी जपण्यासाठी डॉ. राजेंद्र व सुचेता धामणे यांच्या शिंगवे येथील राहत्या घरी हा प्रकल्प उभारला जाणार असून, पहिल्या टप्प्यात ५० खाटांची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे.

या प्रकल्पात रस्त्यावर, धार्मिक स्थळी सोडून दिलेल्या वयस्क माता-भगिनींचे शेवटपर्यंत उपचार व काळजी घेण्यात येईल. पुढच्या टप्प्यात वयस्क पुरुषांसाठी सुविधा निर्माण करण्यात येईल. या प्रकल्पाचे भूमिपूजन सामाजिक कार्यकर्ते, मेळघाटातील आदिवासींसाठी आयुष्य समर्पित करणारे पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे यांच्या हस्ते २९ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ वास्तुविशारद संजय सोवनी, ज्येष्ठ चार्टर्ड अकाउंटंट अशोक गुर्जर, अभियंता अविनाश कुलकर्णी व नाट्य चित्रपट कलावंत व निर्माते बलभीम तथा आबाजी व मेघमाला पठारे यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी मनगाव येथील विठाई सभागृहात पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे यांना यंदाचा स्व. दादा धामणे कर्मयोगी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रोख ११ हजार व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. राजेंद्र, डॉ. सुचेता व डॉ. किरण धामणे यांनी केले आहे.