जवळे : पारनेर तालुक्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे श्रीक्षेत्र पिंपळनेर येथे राष्ट्रीय संत संताजी महाराज जगनाडे यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मंदिर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. मंगळवारी या मंदिराच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
पारनेर येथील कोंडिबा पतके व सुमन कोंडिबा पतके यांची अनेक वर्षांपासून श्रीक्षेत्र पिंपळनेर येथे राष्ट्रीय संत संताजी महाराज जगनाडे यांचे मंदिर मंदिर व्हावे, अशी इच्छा होती. त्यांची ही इच्छा त्यांची मुले संजय पतके, विजय पतके, अजय पतके यांनी पूर्णत्वास नेण्याचा निश्चय केला आहे. त्यानुसार जगनाडे महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीचे औचित्य साधून मंदिराच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. अजय पतके म्हणाले, अनेक वर्षांपासून श्रीक्षेत्र प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे निळोबाराय यांच्या मायभूमीत संताजी महाराज जगनाडे यांचे मंदिर व्हावे, अशी आई, वडिलांची इच्छा होती. हे मंदिर २० गुंठे जागेत होणार असून ९ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. या मंदिरात संत संताजी महाराज जगनाडे यांची भव्य मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. तसेच संत जगद्गुरू तुकाराम महाराज व इतरही संतांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
कार्यक्रमात पारनेर तालुका तिळवण तेली समाजाच्या वतीने महिला अध्यक्ष कमल देशमाने यांच्या हस्ते सुप्रिया पतके, सूर्यकांत काळे, दशरथ काळे, ओंकार काळे, आदित्य देवकर, अदिती देवकर, प्रवीण थोरात, स्नेहल काळे, वैष्णवी शेलार आदी गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पारनेर तालुका तिळवण तेली समाज अध्यक्ष रोहिदास काळे, उपाध्यक्ष शिरीष शेलार, रामदास महाराज शिरसागर, शिवाजी काळे, बाबासाहेब दिवटे, उद्धव वालझाडे, तुकाराम काळे, महेश शेलार, बाळासाहेब शेजवळ, केशव शेलार, मदन रत्नपारखी, विनायक शेलार, कैलास शेलार, सुभाष शेलार, रवींद्र पतके, दत्तात्रय पतके, अविनाश काळे, दिलीप देशमाने, रमेश पतके, रामचंद्र थोरात, चंद्रकांत काळे, रोहिदास काळे आदी उपस्थित होते.
.........
पोटो