शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळांच्या अटकेचा नगरमध्ये निषेध

By admin | Updated: March 16, 2016 08:29 IST

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या अटकेचे तीव्र पडसाद मंगळवारी नगर शहरासह जिल्ह्यात उमटले़

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या अटकेचे तीव्र पडसाद मंगळवारी नगर शहरासह जिल्ह्यात उमटले़ जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील पाथर्डी, कोपरगाव, संगमनेर, नेवासा, श्रीगोंदा, जामखेड, राहता, अकोले तहसील कार्यालयांवर समता परिषद व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्र मोर्चे काढून भुजबळ यांच्या अटकेचा निषेध केला़ संगमनेर येथे कार्यकर्ते व अधिकाऱ्यांत शाब्दीक चकमक उडाली़ माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार छगन भुजबळ यांच्यावर सरकारने सूडबुद्धीने कारवाई केली आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या नेतृत्वाखाली उबेद शेख, संजय झिंजे, किसन लोटके, राधेशाम धूत आदी पदाधिकारी मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले़ निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांची भेट घेऊन त्यांनी निवेदन दिले़ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे यांच्यासह महापौर अभिषेक कळमकर, जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड, महापालिका सभागृह नेते कुमार वाकळे, प्रकाश भागानगरे, बाबासाहेब गाडळकर, विकी जगताप आदी पदाधिकाऱ्यांनीही शहरातून मोर्चा काढून भुजबळ यांच्या अटकेचा निषेध केला़ भुजबळ यांच्या अटकेच्या निषेधार्थ भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी आक्रमक झाले़ त्यांनी खासदार किरीट सोमय्या यांच्या पुतळ्याचे शिवाजी पुतळ्यासमोर प्रतिकात्मक दहन केले़ दत्ता जाधव, संजय दळवी, प्रसाद भडके, विनायक नेवसे, सचिन गुलदगड, रोहन डागवाले, निखिल शेलार आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते़ यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली़ याशिवाय जिल्ह्यातील तालुकास्तरावरील राष्ट्रवादी काँग्रेस व समता परिषदेच्या वतीने ठिकठिकाणी मोर्चे व आंदोलने करण्यात आली़ कारवाई मागे न घेतल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी निवेदनाद्वारे दिला.