शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

भूईकोट किल्ल्यात ‘मैं भी नेहरू’; तिनशे विद्यार्थ्यांनी केली वेशभूषा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 13:56 IST

भूईकोट किल्ला येथे जी. एस. ढोरजकर फाउंडेशनच्या वतीने बाल दिनानिमित्त ‘मैं भी नेहरू’उपक्रम राबविण्यात आला.

भिंगार : भूईकोट किल्ला येथे जी. एस. ढोरजकर फाउंडेशनच्या वतीने बाल दिनानिमित्त ‘मैं भी नेहरू’उपक्रम राबविण्यात आला. यावेळी तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी नेहरूंसारखी वेषभूषा केली होती. यावेळी ‘फ्रीडम रॅली’ काढण्यात आली होती.पंडित नेहरू यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. ढोरजकर फाउंडेशनने भूईकोट किल्ला येथे यंदा ‘मैं भी नेहरू’ उपक्रम राबवून नेहरूंना अभिवादन करण्यात आले. गुरुवारी सकाळी आठ वाजता त्यांची पालकांसह किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते नेता कक्षापर्यंत फ्रीडम रॅली काढण्यात आली. पंडित नेहरू यांना ‘चले जाव’ चळवळीत याच नेता कक्षात स्थानबद्ध करण्यात आले होते. तेथे त्यांनी वापरलेली खुर्ची व अन्य साहित्य आहे. तेथे अभिवादन केल्यावर या कक्षासमोर राष्ट्रगीत गायन करून राष्ट्रीय एकात्मतेची सामुदायिक शपथ घेण्यात आली. त्यानंतर स्वच्छता अभियान राबवून वृक्षारोपण केले. यावेळी इतिहास संशोधक प्रा. नवनाथ वाव्हळ यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य लढा, किल्ल्याची माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांना नेहरू टोपी, गुलाबाचे फुल, डिस्कव्हरी आॅफ इंडियाची प्रतिकृती देण्यात आली. एल अ‍ॅण्ड टी कंपनीचे सरव्यवस्थापक अरविंद पारगावकर, इतिहास अभ्यासक डॉ. संतोष यादव, फाउंडेशनचे अध्यक्ष सीताराम ढोरजकर, संचालक आदर्श ढोरजकर, सुजाता नैलवाल, निवेदक अमोल बागुल, साई इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या आकांक्षा ढोरजकर आदी उपस्थित होते. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFortगड