शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’चे सुरेश व्दादशीवार यांना भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 16:09 IST

सहकार, साहित्य, समाजसेवा, पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल ‘लोकमत’चे संपादक, साहित्यिक सुरेश द्वादशीवार यांना स्वांतत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती

ठळक मुद्देप्रेरणा दिन, पुरस्कार सोहळाविलास शिंदे, बाजीराव खेमनर, सुलोचना खेमनर यांचाही समावेश

संगमनेर : सहकार, साहित्य, समाजसेवा, पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल ‘लोकमत’चे संपादक, साहित्यिक सुरेश द्वादशीवार यांना स्वांतत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्काराने तर कृषी, शिक्षण, समाजसेवा, पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल नाशिक येथील सी. एम.डी. सह्याद्री फार्मसचे विलास शिंदे यांना डॉ.अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्काराने व सहकारातील ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर व त्यांच्या पत्नी सुलोचना खेमनर यांना सहकारातील सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याची घोषणा आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी शनिवारी येथे केली. एक लाख रूपये व सन्माचिन्ह असे या तिन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे.स्वातंत्र्यसैनिक सहकारमहर्षी दिवंगत भाऊसाहेब थोरात व हरित क्रांतीचे प्रणेते दिवंगत डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त संगमनेरात १० ते १२ जानेवारी दरम्यान प्रेरणादिन व पुरस्कार प्रदान सोहळ्याबरोबरच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी आमदार बाळासाहेब थोरात हे राहणार असून सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, हरियाणा येथील रोहटक लोकसभा मतदार संघाचे खासदार दीपेंदरसिंग हुडा, हिंगोलीचे खासदार राजीव सातव आदींच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण शुक्रवारी (११ जानेवारी) दुपारी साडेबारा वाजता संगमनेरातील मालपाणी लॉन्स येथे या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. यापूर्वी ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, मधुकर भावे, ज्येष्ठ लेखक भानू काळे, माजी आमदार दिवंगत सा. रे. पाटील आदींना या पुरस्कारने गौरविण्यात आल्याचे डॉ. तांबे यांनी सांगितले.पुरस्कारार्थींची निवड विजयअण्णा बोराडे (मराठवाडा शेती सहाय्य मंडळ, औरंगाबाद), डॉ. राजीव शिंदे (प्रख्यात सर्जन, श्रीरामपूर), उल्हास लाटकर (अमेय प्रकाशन, पुणे), उत्कर्षा रूपवते (राष्टÑीय सचिव, युवक कॉँग्रेस), केशव जाधव (सेवानिवृत्त प्राचार्य, अमृतवाहिनी मॉडेल स्कू ल), प्रा. बाबा खरात (आदिवासी सेवक) यांच्या निवड समीतीने केली आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार डॉ. तांबे, जयंती महोत्सव कार्यक्रम संयोजन समिती व अमृत उद्योग समुहाच्या वतीने केले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर