जनसेवा मंडळाचे तालुकाध्यक्ष भास्करराव दिघे यांचे बुधवारी रात्री ह्रदयविकाराने निधन झाले. कोल्हेवाडी येथे शोकाकूल वातावरणात गुरूवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रद्धांजली सभेत आमदार विखे बोलत होते.
विखे म्हणाले, सर्वांना हवे असलेले संयमी व्यक्तीमत्व म्हणून आप्पांची ओळख होती. कोल्हेवाडी गावात भगतसिंग सहकारी दूध संस्था आणि पतसंस्था स्थापन करून या गावाला गावपण मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. प्रसंगी त्यांना त्रास सहन करावा लागला पण परिणामांचा विचार त्यांनी कधी केला नाही. दिवंगत खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या समवेत विविध प्रश्नांच्या संदर्भात संघर्ष करताना सहकार्यांच्या मिळालेल्या फळीतील खंदा कार्यकर्ता म्हणूनच त्यांनी भूमिका बजावली. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी भास्कराव दिघे यांच्याशी असलेल्या नात्याच्या आठवणींना उजाळा देवून श्रद्धांजली अर्पण केली. प्रा. एस. झेड देशमुख, इंद्रभान थोरात, वसंत देशमुख, सदाशिव थोरात, नामदेव गुंजाळ यांचीही भाषणे झाली. काॅंग्रेसचे संगमनेर तालुकाध्यक्ष अध्यक्ष बाबा ओहोळ, भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष जर्नादन आहेर, दिलीप शिंदे, अशोक सातपुते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुभाष कोथमिरे, राजेंद्र देशपांडे यांच्यासह जिल्हयातून आलेले विविध क्षेत्रातील कार्यकर्ते संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
-------------