शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

बाभळींनी वेढली भिंगार पोलीस कॉलनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 16:28 IST

पोलीस कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय पोलीस कॉलनीत राहतात की, वेड्या बाभळीच्या काटवनात? असा प्रश्न भिंगारची पोलीस वसाहत पाहिल्यानंतर पडतो़

अरुण वाघमोडेअहमदनगर : पोलीस कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय पोलीस कॉलनीत राहतात की, वेड्या बाभळीच्या काटवनात? असा प्रश्न भिंगारची पोलीस वसाहत पाहिल्यानंतर पडतो़ नगर शहरातील पोलीस कॉलनीसारखीच भिंगार कॉलनीचीही दुरवस्था झालेली आहे़ कचऱ्यांचे ढिग, तुंबलेल्या गटारी, तुटलेले विजेचे दिवे आणि मोडकळीस आलेल्या खोल्या अशी दयनीय अवस्था या वसाहतीची आहे़भिंगार येथील पोलीस कॉलनीत ६० घरे आहेत़ यातील २५ ते ३० घरे हे राहण्यासाठी योग्य नाही़ येथे २५ पोलीस कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय राहतात़ या कुटुंबीयांना या घरांना घरपण देताना नाकीनऊ येत आहे़ या कॉलनीतील सर्वच रस्ते उखडलेले आहेत़ गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यांचे कामे झालेली नाहीत़ कॉलनीत असलेले विजेचे खांब नुसतेच उभा आहेत़ यावरील दिवे कधीच लागत नाहीत़ घरांच्यासमोरील आणि पाठीमागील गटारी तुंबलेल्या आहेत़ येथील कचरा उचलण्यासाठी कुणीच येत नाही़ कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या अंतर्गत ही वसाहत येत नाही़ त्यामुळे येथील रहिवाशांना त्यांच्याकडून काही सुविधा मिळत नाहीत़ या कॉलनीतील घरांची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे़ या विभागाकडून अनेक वर्षे येथील दुरूस्ती झाली नसल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले़ पाणीपुरवठा करणाºया पाईपलाईनही तुटलेल्या आहेत़वादळात उडाले होते पत्रेआठ दिवसांपूर्वी झालेल्या वादळात पोलीस कॉलनीत असलेल्या एक बंगल्यावरील पत्रे उडून गेले होते़ येथील सर्व घरे मोडकळीस आलेली आहेत़ १९१८ मध्ये या खोल्या बांधलेल्या आहेत़ त्यामुळे वादळी पावसात या घरांना धोका आहे़ येथील रहिवाशांना जीव मुठीत घेऊन रहावे लागते़वर्गणी करून करावी लागते दुरस्तीकॉलनीतील पाण्याचे पाईप तुटले तसेच इतर काही अडचणी आल्या तर येथील रहिवाशांना वर्गणी करून तेथील दुरुस्ती करावी लागते़ या कॉलनीतील मोकळ्या जागेत नगर तालुका व भिंगार पोलिसांनी जप्त केलेले वाहने व अपघातातील वाहने ठेवलेली आहेत़ या कॉलनीला प्रवेशद्वार नसल्याने येथे सहज कुणीही प्रवेश करू शकते़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर