शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

भंडारदरा ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 14:47 IST

उत्तर नगर जिल्ह्याची भाग्यरेखा ठरलेल्या भंडारदरा धरण आज १०० टक्के भरले. आज दुपारी बारा वाजता १० हजार ५३३ दशलक्ष घनफुट झाल्यानंतर पाटबंधारे विभागाने भंडारदरा तांत्रिक दृष्ट्या भरल्याचे अधिकृत जाहीर केले.

राजूर : उत्तर नगर जिल्ह्याची भाग्यरेखा ठरलेल्या भंडारदरा धरण आज १०० टक्के भरले. आज दुपारी बारा वाजता १० हजार ५३३ दशलक्ष घनफुट झाल्यानंतर पाटबंधारे विभागाने भंडारदरा तांत्रिक दृष्ट्या भरल्याचे अधिकृत जाहीर केले.यावर्षी भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू होण्यापूर्वी धरणातील पाणीसाठा ३ हजार १९९ दशलक्ष घनफुट इतका होता. पाणलोट क्षेत्रात जूनमध्ये पावसाचे आगमन झाले. दुस-या आठवड्यानंतर धरणात नवीन पाण्याची आवकही सुरू झाली. जुलैच्या दुस-या आठवड्यात या परिसराला मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला. यानंतर पावसाचे प्रमाण वाढत राहिले. जुलैच्या दुस-या आठवड्यानंतर तर या परिसराला तीन वेळा अतिवृष्टीचा तडाखाही बसला होता. धरण ८६ टक्के भरल्यानंतर आणि पावसाचा वाढता जोर पाहून २१ जुलै रोजी सायंकाळपासून धरणाच्या स्पिलवे गेटमधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली. मात्र चार दिवसानंतर पावसाचा जोर कमी होत गेला आणि पाणी सोडण्याचे प्रमाण कमी करण्यात आले. मागील आठवड्यापासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याने धरणातील पाणी पातळी वाढत गेली. धरणातील पाणीसाठा १० हजार ५०० दशलक्ष घनफुट झाल्यानंतर धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे पाटबंधारे विभाग जाहीर करत असते. अखेर आज (रविवारी) दुपारी बारा वाजता ११ हजार ३९ दशलक्ष घनफुट क्षमता असणा-या या धरणातील पाणीसाठा १० हजार ५३३ दशलक्ष घनफुट झाला. धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी जाहीर केले. उपविभागीय अभियंता रामनाथ आरोटे, सहाय्यक अभियंता कांबळे कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.या वर्षी १२ आॅगस्ट दुपारी बारापर्यंत १३ हजार ७९२ दशलक्ष घनफुट नवीन पाण्याची आवक झाली तर पूर्वीचे ३हजार १९९ दशलक्ष घनफुट पाणी शिल्लक होते. यातील या वर्षात आजपर्यंत आवर्तने, पाणी पातळी स्थिर ठेवण्याच्या दृष्टीने सोडण्यात आलेले पाणी असे एकूण ६ हजार ४५८ दशलक्ष घनफुट पाणी सोडण्यात आले. सोडण्यात येत असलेले पाणी निळवंडे धरणात साठविण्यात येत होते. निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे उशीराने आगमन झाले, त्यातच सध्या निळवंडे धरणातून खरीपाचे आवर्तन सुरु आहे. त्यामुळे आता निळवंडे केव्हा भरणार याची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले