शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

भंडारदरा धरण उपेक्षेच्या गर्तेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:09 IST

राजूर : उत्तर नगर जिल्ह्याची भाग्यरेखा ठरलेल्या आणि बांधकाम पूर्ण होऊन ९४ वर्षे पूर्ण झालेले भंडारदरा धरण देखभाल दुरुस्तीअभावी ...

राजूर : उत्तर नगर जिल्ह्याची भाग्यरेखा ठरलेल्या आणि बांधकाम पूर्ण होऊन ९४ वर्षे पूर्ण झालेले भंडारदरा धरण देखभाल दुरुस्तीअभावी अद्यापही उपेक्षेच्या गर्तेत आहे. १९१० मध्ये भंडारदरा धरणाच्या कामास प्रारंभ झाला आणि १९२६ मध्ये या धरणाचे काम पूर्ण झाले.

२६५.७० फूट उंचीच्या भंडारदरा धरणास ५० फूट, १०० फूट, १५० फूट आणि २०० फूट पातळीवर मोऱ्या आहेत. प्रत्येक ठिकाणी ३ फूट व्यासाच्या दोन अशा एकूण आठ मोऱ्या आहेत. या मोऱ्यावर सलुईस आणि निडल अशा दोन प्रकारच्या झडपा बसविण्यात आल्या. पाणी सोडण्याची या यंत्रोस ९० वर्षे झाली. यातील ५० फुटांवरील एक आणि १०० फुटावरील एका मोरीवर यांत्रिक पद्धतीचे व्हॉल्व्ह बदलण्यात आले आहेत. बाकी सहा मोऱ्यांवर जुनाट यंत्रणा उभी आहे. ही सर्व यंत्रणा मोडकळीस येण्याच्या मार्गावर आहे. घर्षणामुळे या सहा मोऱ्यांच्या झडपांचे आटे गुळगुळीत झाले आहेत. त्यामुळे मोऱ्यांची दारे नीट बंद होत नाहीत आणि त्यातून पाणी गळती सुरू असते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात या धरणाच्या गेटमधून पाणी सोडण्यासाठी अध्यापही मनुष्यबळ वापरले जात आहे. त्यामुळे एखाद्या वेळी कुठलीही अनुचित घटना घडू शकते.

यांत्रिकीकरणाच्या युगात इतर काही धरणांची पाणी पातळी मोजण्यासाठी सेन्सरचा वापर केला जात आहे. याआधारे पाणी पातळी, हवेचा वेग, बाष्पीभवन आदी मोजले जाते. मात्र, जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, राहाता, राहुरी आणि नेवासा या सहा तालुक्यांतील सुमारे ५० हजार हेक्टर क्षेत्राला ओलिताखाली आणणाऱ्या या धरणाची पाणी पातळी आजही गेज पट्टीच्या साहाय्याने मोजली जात आहे. १९६९ मध्ये भूकंपाच्या धक्क्यानंतर धरणास तडे गेल्याचे निदर्शनास आले होते. त्यावेळी धरणाच्या भिंतीत मोठ्या प्रमाणावर बदल करत धरणाचे मजबुतीकरण करण्यात आले होते. मागील काही वर्षांपूर्वी येथे भूकंप मापन यंत्रणा बसविण्यात आली होती. मात्र, त्यावेळी या यंत्रणेतील सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्यापासून भूकंप मापन यंत्रणा कार्यान्वित नाही.

केंद्रीय जलआयोगाच्या समितीने मागील वर्षी या धरणाची पाहणी केली. यानंतर धरण सुरक्षा समितीने धरणाची पाहणी करून तसा अहवाल पाठविला. याबरोबरच येथील पाटबंधारे विभागानेही धरणाच्या देखभाल दुरुस्तीसंदर्भात अनेक वेळा प्रस्तावही पाठविले असल्याचे वेळोवेळी सांगितले आहे. मात्र, परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.

................

प्रोफाइल वॉल बांधण्याची मागणीही प्रलंबित

जिल्ह्याची पर्यटन पंढरी म्हणून ओळख असलेल्या भंडारदरा परिसरातील रस्त्यांची तसेच पर्यटकांचे आकर्षण असणाऱ्या धरणाखालील बागेची दुरवस्था पाहण्यास मिळत आहे. येथील वर्ग एकच्या बंगल्याचे दुरुस्तीचेही काम अर्धवट अवस्थेत आहे. देखभाल दुरुस्तीचेही प्रस्ताव पाठवले असले तरी मात्र निधी उपलब्ध होत नसल्याने धरणाचे मजबुतीकरण उपेक्षेच्या गर्तेत कायम आहे. धरण परिसरातील ज्या गावांमध्ये धो धो पाऊस कोसळून धरण भरते त्याच गावांना उन्हाळ्यात धरणातील पाणी खोलवर तसेच दूरवर जात असल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असते. ही समस्या सोडवण्यासाठी या धरणात बुडीत बंधारे बांधण्याची आणि प्रवरा पात्रात प्रोफाइल वॉल बांधण्याची जुनी मागणी प्रलंबित आहे.