शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
2
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
3
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
4
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
5
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
6
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
7
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
8
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
9
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
10
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
11
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
12
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
13
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
14
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
15
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
16
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
17
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
18
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
19
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
20
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान

भंडारदरा ७५ टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 14:38 IST

भंडारदरा-मुळा धरण पाणलोटासह तालुक्यातील आज्यापर्वत, कुमशेत, हरिश्चंद्रगड, रतनगड, घाटघर व अकोले शहर परिसरात पाच दिवसांपासून संततधार पावसाचे रुद्रावतारी तांडव सुरू आहे.

अकोले(अहमदनगर) : भंडारदरा-मुळा धरण पाणलोटासह तालुक्यातील आज्यापर्वत, कुमशेत, हरिश्चंद्रगड, रतनगड, घाटघर व अकोले शहर परिसरात पाच दिवसांपासून संततधार पावसाचे रुद्रावतारी तांडव सुरू आहे. या धुवाँधार बरसातीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोमवारी दिवसभरात घाटघर तेथे २५८, तर रतनवाडी येथे २४३ मिलिमीटर पाऊस कोसळल्याची नोंद मंगळवारी सकाळी झाली. या पावसामुळे भंडारदरा धरण ७५ टक्के, तर निळवंडे धरण २५ टक्के भरले आहे.सोमवारी दिवसभर तालुक्यात सर्वदूर आषाढसरींचा वर्षाव सुरू होता. भंडारदरा धरणात सोमवारी २४ तासांत तब्बल ८७६ दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली आहे. तर या मोसमात धरणात नव्याने सात टीएमसी पाणी दाखल झाल्याने भंडारदरा धरणाचा पाणीसाठा आठ टीएमसीवर पोहोचला आहे. निळवंडेत दोन टीएमसी पाणी आले आहे. मंगळवारी सकाळी पावसाची झालेली नोंद व कंसात या मोसमात पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये-घाटघर २५८ (२४९२), रतनवाडी २४३ (२४५३), भंडारदरा १७८ (१५००), पांजरे १८९ (१७४५), वाकी १५५ (१३३४), निळवंडे ४५ (३४३), अकोले ३९ (३३८), आढळा १० (११५), कोतूळ ३१ (१८०). मुळा-भंडारदरा-निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. भंडादरा धरणातून वीजनिर्मीती बोगद्याद्वारे ८४० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ७८३० दशलक्ष घनफूट, तर निळवंडेचा पाणीसाठा २०२५ दशलक्ष घनफूट इतका झाला आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले