शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

आॅलिंपिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक पटकावणारच - भाग्यश्री फंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 15:48 IST

नुकत्याच जपान येथे झालेल्या आशियाई सब ज्युनिअर कुस्ती स्पर्धेत ५७ किलो वजन गटात रौप्यपदक पटकावणारी श्रीगोंद्याची कुस्तीपटू भाग्यश्री फंड हिचे नगरमध्ये आगमन होताच तिने प्रथम ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली. यावेळी आॅलिंपिकमध्ये सुवर्णपदक पटकावणारच, असा विश्वास श्रीगोंदा येथील कुस्तीपटू भाग्यश्री फंड हिने व्यक्त केला.

अहमदनगर : आशियाई कुस्ती स्पर्धेत पहिल्याच प्रयत्नात रौप्यपदक पटकावल्यामुळे आत्मविश्वास उंचावला असून, आता आॅलिंपिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक पटकावण्यासाठी मेहनत घेणार आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या आॅलिंपिकची तयारी सुरु आहे. या आॅलिंपिकमध्ये सुवर्णपदक पटकावणारच, असा विश्वास श्रीगोंदा येथील कुस्तीपटू भाग्यश्री फंड हिने व्यक्त केला.नुकत्याच जपान येथे झालेल्या आशियाई सब ज्युनिअर कुस्ती स्पर्धेत ५७ किलो वजन गटात रौप्यपदक पटकावणारी श्रीगोंद्याची कुस्तीपटू भाग्यश्री फंड हिचे नगरमध्ये आगमन होताच तिने प्रथम ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली. यावेळी प्रशिक्षक किरण मोरे, जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे, कुस्तीपटू धनश्री फंड, बापूराव फंड, शिवराज रोडे, बापूराव निंभोरे, बाळासाहेब मुंडफण, सरपंच सोन्याबापू कानगुडे, पोपट डांगे, मुबारक शेख, भरत भांडवलकर आदी उपस्थित होते.जपान येथून दिल्ली विमानतळावर आल्यानंतर भाग्यश्री रेल्वेने नगरला आली़ नगर येथे रेल्वे स्थानकाबाहेर तिचे जंगी स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशांच्या गजरात तिच्या खेळाचे नगरकरांनी कौतुक केले. जिल्हा तालीम संघाचे पदाधिकारी, टाकळी लोणार व कोळगावचे ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. रेल्वे स्थानकावरील स्वागत स्वीकारल्यानंतर भाग्यश्री थेट ‘लोकमत’ कार्यालयात पोहोचली. ‘लोकमत’मध्ये सत्कार स्वीकारल्यानंतर तिने ‘लोकमत’शी संवाद साधला.भाग्यश्री म्हणाली, देशाबाहेर खेळल्यामुळे तिकडच्या महिला खेळाडूंचा अनुभव, त्यांची खेळण्याची पद्धत समजते. आपल्याला नक्की पुढे कशा पद्धतीने सराव करायचा आहे, याची दिशा निश्चित करता येते़ तिकडे शिस्तीला खूप महत्व आहे. खूप कमी वयात आशियाई स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाल्यामुळे आपला आत्मविश्वास उंचावला असून, पुढील स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची जिद्द ठेवून सराव करणार आहे़ सध्या पुण्यात सराव सुरु आहे. २०२४ मध्ये होणा-या आॅलिंपिकची तयारी आतापासून करत आहे़ त्यामुळे आॅलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकणे हेच माझे ध्येय आहे, असे ती म्हणाली.

भाग्यश्रीकडे परिश्रम घेण्याची तयारी आणि जिद्द आहे़ ती कठोर मेहनत घेत आहे़ व्यायाम आणि सराव ती कधीही चुकवत नाही़ कमी वयात तिने मोठे यश मिळविले आहे़ आॅलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याची तिच्यामध्ये क्षमता आहे.-किरण मोरे, भाग्यश्रीचे प्रशिक्षक

भाग्यश्रीला अधिक दर्जेदार, अद्ययावत प्रशिक्षण मिळावे, योग्य आहार मिळावा, तिचे जास्तीत जास्त प्रशिक्षण परदेशात व्हावे, यासाठी भारतीय कुस्ती महासंघाकडे प्रयत्न करीत आहे़ नगरमध्ये नरेंद्र फिरोदिया यांनी भाग्यश्रीला मदतीचा हात दिला आहे़ नगरमध्येच अद्ययावत कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरु व्हावे, असाही प्रयत्न सुरु आहे.-वैभव लांडगे, जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाWrestlingकुस्ती