श्रीगोंद्या : १४ वर्षाखालील आशियाई चॅम्पियन स्पर्धेसाठी श्रीगोंद्याची सुवर्ण कन्या भाग्यश्री हनुमंत फंड हिची निवड झाली आहे. ९ नोव्हेंबर रोजी जपानमध्ये आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धा होणार आहेत. भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने दिल्ली येथे झालेल्या निवड चाचणीत भाग्यश्री फंड हिने ५८ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला. खेलो इंडीया राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतही भाग्यश्री फंड हिने ५३ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकविले होते.
आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी भाग्यश्री फंडची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 15:21 IST