शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

भगवानगडावरील गर्दी ओसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 17:48 IST

पाथर्डी (जि. अहमदनगर) : सुमारे पंचवीस वर्षांपासून भगवानगडावर होणाºया दसरा मेळाव्याची परंपरा यंदा प्रथमच खंडित झाली. दरवर्षीच्या तुलनेत शनिवारी भगवानगडावरील गर्दी कमी असली, तरी हजारो भाविकांनी दिवसभर सोयीच्या वेळेनुसार भगवानबाबांच्या समाधिस्थळाचे दर्शन घेतले. ‘भगवानबाबा की जय’ अशा घोषणांनी गड दुमदुमवा. गडावर जमावबंदी लागू असल्याने भक्त समाधिस्थळाचे दर्शन घेऊन लगेच परतत होते.

पाथर्डी (जि. अहमदनगर) : सुमारे पंचवीस वर्षांपासून भगवानगडावर होणाºया दसरा मेळाव्याची परंपरा यंदा प्रथमच खंडित झाली. दरवर्षीच्या तुलनेत शनिवारी भगवानगडावरील गर्दी कमी असली, तरी हजारो भाविकांनी दिवसभर सोयीच्या वेळेनुसार भगवानबाबांच्या समाधिस्थळाचे दर्शन घेतले. ‘भगवानबाबा की जय’ अशा घोषणांनी गड दुमदुमवा. गडावर जमावबंदी लागू असल्याने भक्त समाधिस्थळाचे दर्शन घेऊन लगेच परतत होते.भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी दसºयाच्या दिवशी राजकीय नेत्यांच्या भाषणबंदीचा ठराव सलग दुसºया वर्षी केल्याने ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याचे स्थळ बदलले. भगवानबाबांचे जन्मगाव असलेल्या सावरगाव (ता. पाटोदा, जि. बीड) येथे मेळावा घेतल्याने गडावर गर्दी होणार का? याकडे राज्याचे लक्ष लागले होते. महंत डॉ. नामदेव शास्त्री व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यात मेळाव्यावरून झालेल्या वादामुळे पोलिसांनी भगवानगडावर मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला होता. गडावर जमावबंदीचा आदेश लागू होता. गडाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पोलिसांनी व्हॅन उभ्या केल्या होत्या. तसेच प्रत्येक ठिकाणी पोलीसांची वेगवेगळी पथके गडावर होती. शनिवारी सकाळी महंत डॉ. नामदेव शास्त्री यांच्या हस्ते भगवानबाबांच्या समाधीला अभिषेक करण्यात आला. सकाळी गडावर शुकशुकाट होता, परंतु सकाळी अकरानंतर गर्दी वाढण्यास सुरुवात झाली. दुपारी भक्तांनी गटागटाने येत दर्शन घेतले. दर्शनानंतर भक्त गडावर थांबत नसल्यामुळे गर्दी दिसली नाही.-------------भगवानगडावर होणाºया मेळाव्याच्या मुद्यावरून झालेल्या वादाची पार्श्वभूमी पाहाता पोलिसांनी गडाच्या पायथ्यापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर वाहने अडविली. त्यामुळे गडावर भाविकांना पायी जावे लागले. गडावर जाणाºया तिन्ही रस्त्यांवरून भाविक येताना दिसत होते. प्रत्येक पॉइंटवर पोलीस बंदोबस्त तैनात होता. सायंकाळच्या सुमारास भगवानगडावर सीमोल्लंघनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर रात्री गुरुमंत्राचा कार्यक्रम पार पडला. गेल्या २५ वर्षांपासून दसºयाच्या दिवशी भगवानगडावर मोठ्या प्रमाणात गर्दी असायची, परंतु आज मात्र तुलनेने गर्दी कमी होती. पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्यामुळे गडाला छावणीचे स्वरूप आले होते.---आमची काही दुकानदारी नाही. जो भगवानबाबांचा भक्त आहे, तो गडावर दर्शनासाठी येत आहे. सगळे भक्त एकत्रित नसल्यामुळे गर्दी दिसत नसली, तरी भक्त मोठ्या संख्येने गडावर येत आहेत. -डॉ. नामदेव शास्त्री, महंत भगवानगड---------