डॉ. जाधव यांनी मार्गदर्शन केलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन स्पर्धेत यश मिळविले आहे. अलीकडच्या काळात त्यांनी मार्गदर्शन केलेले प्रशांत पाटील या विद्यार्थ्याने बनविलेले ‘आधुनिक कृषियंत्र’, ‘शेती अवजारांच्या साह्याने वीज निर्मिती’ या उपकरणास राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर तृतीय क्रमांक मिळाला आहे. राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या मार्गदर्शक समितीस प्राप्त वीस प्रस्तावांपैकी डॉ. जाधव यांच्या प्रस्तावाची समितीने दखल घेत त्यांना जाहीर केला. त्यांच्या या यशाबद्दल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सुधीर तांबे, महाराष्ट्र होमिओपॅथिक फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. राधेश्याम गुंजाळ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पूनम ढगे, कार्यकारी विश्वस्त डॉ. राहुल गुंजाळ, आदींनी कौतुक केले आहे.
स्वाती जाधव यांना सर्वोत्कृष्ट मार्गदर्शक पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:20 IST