शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

दारुमुळे रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचा दावा मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:20 IST

शेवगाव (अहमदनगर): देशी दारूचा काढा घेतल्याने कोरोनाचे रुग्ण बरे होतात या दाव्यापासून संबंधित डॉक्टरने तीनच दिवसात घूमजाव केले आहे. ...

शेवगाव (अहमदनगर): देशी दारूचा काढा घेतल्याने कोरोनाचे रुग्ण बरे होतात या दाव्यापासून संबंधित डॉक्टरने तीनच दिवसात घूमजाव केले आहे. ‘कुणीही या पद्धतीने उपचार करू नये. त्यातून काही उद्भवल्यास आपण जबाबदार राहणार नाही’, असा पवित्रा आता या डॉक्टरने घेतला आहे. दरम्यान, यामुळे मोठ्या प्रमाणावर अफवा पसरल्याने प्रशासन काय कारवाई करणार याची उत्सुकता आहे.

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील डॉ. अरुण भिसे यांनी गत आठवड्यात आपण देशी दारूची मात्रा देऊन कोरोना रुग्ण बरे केल्याचा दावा केला होता. पन्नासहून अधिक रुग्णांना आपण दररोज तीस मिलीलीटर देशी दारू दिली. ही ठरावीक मात्रा दिल्यानंतर रुग्ण बरे झाल्याचे आढळले, असे कथन त्यांनी सोशल मीडियावर केले होते.

‘लोकमत’ने प्रशासनाचे या दाव्याकडे लक्ष वेधल्यानंतर शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. रामेश्वर काटे यांनी डॉ. भिसे यांना खुलासा विचारला होता. तहसीलदार अर्चना पागिरे यांनीही त्यांना समक्ष उपस्थित राहून खुलासा करण्यास बोलविले होते. प्रशासनाकडून पत्रव्यवहार सुरू होताच भिसे यांनी आपला दावा मागे घेतला आहे. प्रशासनाकडून आलेल्या नोटीसला त्यांनी बुधवारी सायंकाळी उत्तर दिले आहे. ‘सर्वांना सांगू इच्छितो की मी माझ्या पोस्टमध्ये फक्त आणि फक्त देशी दारूने कोरोना बरा होतो असा कोणताही दावा केलेला नाही. मी रुग्णांना शासनमान्य ॲलोपॅथिक औषधे पण दिली होती. कोरोनावर दारूचा उपचार करण्यास शासनाने अगर तज्ज्ञांनी मान्यता दिलेली नाही. त्यामुळे कोणीही कोरोना रुग्णाला दारू देऊ नये. त्यासाठी योग्य तो अभ्यास करून कोविड टास्क फोर्सची परवानगी घेणे गरजेचे आहे. माझ्या पोस्टचा गैरअर्थ काढून कोणी अपप्रचार करून व्यसनाचे किंवा दारूचे समर्थन करू नये.’

भिसे यांचा खुलासा तालुका रुग्णालयाने जिल्हा शल्यचिकित्सकांना पाठविला आहे. त्यावर ते काय कारवाई करतात याची प्रतीक्षा आहे.

............

मी व्हिडिओच पाहिला नाही: शल्यचिकित्सक

राज्यभर या दाव्याची चर्चा असताना नगरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा म्हणतात, ‘डॉ. भिसे यांनी काय दावा केला ते मला माहीत नाही. मी हा व्हिडिओच पाहिला नाही. काय दावा आहे तो व्हिडिओ मला पाठवा’. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीही पोखरणा यांनी अशीच प्रतिक्रिया दिली होती. तालुका रुग्णालयाने संबंधित डॉक्टरांकडे खुलासा मागितला असताना शल्यचिकित्सक मात्र हा प्रकार आपणाला माहिती नसल्याचे सांगत आहेत. यापूर्वीही नगर जिल्ह्यातील बबन शिंदे यांनीही आपण कोरोनावरील औषध शोधल्याचा दावा केला होता. ज्याची राज्यभर चर्चा झाली. पुढे तो दावाही हवेत विरून गेला.