शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

२० नोव्हेंबरपासून लगीनघाई; यंदा विवाहाचे ५४ मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 13:49 IST

२० नोव्हेंबरपासून यंदाची लग्नसराई सुरू होत असून हे विवाह मुहूर्त ३० जुलैपर्यंत आहेत. नोव्हेंबर ते जुलै या कालावधीत तब्बल ५४ विवाह मुहूर्त आहेत.

अहमदनगर : तुळशीचे विवाह पार पाडल्यानंतर आता लग्न मुहूर्त सुरू होणार आहेत. २० नोव्हेंबरपासून यंदाची लग्नसराई सुरू होत असून हे विवाह मुहूर्त ३० जुलैपर्यंत आहेत. नोव्हेंबर ते जुलै या कालावधीत तब्बल ५४ विवाह मुहूर्त आहेत. पंचांगाप्रमाणे मुहूर्त संख्येत कमी-अधिक तारखा देण्यात आल्या आहेत. तुळशीचे लग्नानंतर आता बाजारतही खरेदीसाठी लगीनघाई सुरू झाली आहे. तुळशीच्या विवाहानंतर लग्नसराई सुरू होत असल्याने ज्यांच्या घरात लग्न आहेत, ते दिवाळीच्या खरेदीसोबत लग्नासाठीही कपडे, सोने, वस्तुंची खरेदी करतात. दिवाळी आणि तुळशीचे विवाह पार पडले आहेत. त्यामुळे बाजारातही आता लग्नासाठीच्या खरेदीचा उत्साह वाढला आहे. नोव्हेंबरपेक्षा डिसेंबरमध्ये जास्त विवाह मुहूर्त आहेत, तर जानेवारीपेक्षा फेब्रुवारीत मुहुर्तांची संख्या अधिक आहे. मे आणि एप्रिल या दोन महिन्यातही मुहूर्त भरगच्च राहणार आहेत.प्राचीन ग्रंथाचा आधारआतापर्यंत गुरू-शुक्र अस्त असताना चातुर्मासात उपनयन-विवाह मुहूर्त दिले जात नव्हते. परंतु बदलत्या कालमानानुसार अडचणीच्या वेळी गुरू-शुक्र अस्त असताना व चातुर्मासात मुहूर्त द्यावेत, असा विचार पंचांगकर्त्यांच्या परिषदेमध्ये मांडण्यात आला होता. यासाठी प्राचीन ग्रंथाचा आधारही घेण्यात आला आहे. त्यामुळे पंचांगांमध्ये गुरू-शुक्र अस्त आणि चातुर्मासामध्ये (जुलै ते नोव्हेंबर २०२०) गौण मुहूर्त वेगळे दिलेले आहेत. हे मुहूर्त अडचणीच्या वेळी घेण्यास हरकत नाही, असे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. (संदर्भ-लोकमत कालदर्शिका).मुहूर्त समाधानकारकतुळशीचा विवाह म्हणजे देव-दिवाळी. देवाचे लग्न झाल्यानंतर आपल्या घरातील विवाहोच्छुकांचे विवाह लावण्याची परंपरा आहे. तुळशीविवाह समाप्तीने देव-दिवाळी झाली. आता २० नोव्हेंबरपासून यंदाच्या लग्नसराईला प्रारंभ होत आहे. यंदा मुहुर्तांची संख्या समाधानकारक आहे. गुरु-शुक्र अस्त सध्या नसल्याने मुहूर्त समाधानकारक आहेत, असे अहमदनगर जिल्हा पुरोहित मंडळाचे अध्यक्ष किशोर जोशी यांनी  सांगितले. असा आहे मुहूर्त..नोव्हेंबर- २०,२१, २३, २८, डिसेंबर-१, २, ३, ६, ८, ११, १२, १८, जानेवारी-१८, २०, २९, ३०, ३१, फेब्रुवारी- १, ४, १२, १३, १४, १६, २६,२७, मार्च- ३, ४, ८, ११, १२, १९, एप्रिल- १२, १६,२६,२७, मे-२,५,६,८,१२,१४,१७,१८,१९,२४, जून-११,१४,१५,२५,२९,३०, जुलै-२५,२९,३०.    

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर