शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

भंडारदा-यातील काजवा महोत्सवास सुरुवात

By admin | Updated: May 29, 2017 10:57 IST

महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाच्या माध्यमातून आयोजित केल्या जात असलेल्या काजवा महोत्सवात सुरुवात झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारदरा (अहमदनगर) : महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाच्या माध्यमातून आयोजित केल्या जात असलेल्या काजवा महोत्सवात सुरुवात झाली आहे. यंदा काजवा महोत्सव- २०१७ चे आयोजनास वनविभाग, पोलिस यंत्रणा, स्थानिक गाईड व आदिवासी बांधव, हॉटेल व्यवसायिकयांचे सहकार्य लाभत आहे . काजवा महोत्सव बघण्यासाठी पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. सर्व हॉटेल आधीच बुक झाले आहेत. स्थानिक तरुणांनी उभारलेल्या तंबू (टेंन्ट) मध्ये राहून निसर्गाचा आनंद घेत आहेत. दरवर्षी काजवे मे महिन्याच्या मध्यांतरापासून दिसण्याास सुरुवात होते. हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ या झाडांवर मोठ्या प्रमाणात दिसतात. परिसरातील मुरशेत, पांजरे, उडदावणे, घाटघर, साम्रद, रतनवाडी, मुतखेल,भंडारदरा या परिसरात मोठया प्रमाणात पाहावयास मिळतात. हे चमचमणारे दृश्य पाहून भारावून जात असून या नयनरम्य दृश्यांचे फोटो काढत आहेत. भंडारदरा हे पर्यटन स्थळ असल्यामुळे या परिसरात वर्षभर मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. काजवा महोत्सव येणा-या पर्यटकांच्या स्वागतासाठी भंडारदरा परिसरातील हॉटेल सज्ज झाली आहेत. काजवा पाहवयास येणारे पर्यटक घरगुती जेवनाचा आनंद घेत आहेत. झुणका -भाकरी व मिरचीचा ठेचा या मेजवाणीचा आस्वाद घेत आहेत. अनेक स्थानिक तरुणांनी स्टॉल उभे केले आहेत. हातसडीचे तांदूळ, नाचणी, वरी अशा विविध धान्यांचे स्टॉल लावून विक्री केली जात आहे. जंगली वनस्पती, जंगली पालेभाज्या, तसेच बांबूपासून बनवलेल्या वस्तूंचीही वक्री केली जात आहे.