या घटनेत जखमी झालेले महापालिकेचे कर्मचारी गणेश मारुती गव्हाणे (वय ३०, रा. वडगाव गुप्ता) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विक्की बोरा, रत्ना विक्की बोरा, देवराम शेवाळे व शोभा देवराम शेवाळे (सर्व रा. आंधळे चौरे कॉलनी, बोल्हेगाव) यांच्याविरोधात मारहाण करणे व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गव्हाणे हे शुक्रवारी पहाटे गांधीनगर परिसरात व्हॉल्व्हमधून पाणी सोडतो? असताना आरोपींनी त्यांना अडवून आमच्या कॉलनीत कमी दाबाने पाणी का सोडतो? असे म्हणत शिवीगाळ करून लाकडी दांड्याने व चपलेने मारहाण केली. यावेळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी गव्हाणे यांना आरोपींच्या तावडीतून सोडविले. याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रेय जपे हे पुढील तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच महापालिका कामगार संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी गव्हाणे यांची भेट घेत घटनेची माहिती घेतली तसेच या घटनेचा निषेध नोंदविला.
महापालिकेच्या व्हॉल्व्हमनला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:19 IST