शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नगरमध्ये बाप्पा मोरयाच्या जयघोषात गणरायांना निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 17:34 IST

सजविलेल्या रथात विराजमान झालेली बाप्पांची मूर्ती, गणपती बाप्पा मोरया असा जयघोष.. फुले, गुलालाची उधळण, पारंपरिक वाद्यांसह संगीताच्या तालावर तल्लीन होऊन नाचणारी तरुणाई अशा उत्साह आणि जल्लोषपूर्ण वातावरणात गुरुवारी (दि़१२) नगरकरांनी लाडक्या गणरायांना पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत निरोप दिला़ 

अहमदनगर: सजविलेल्या रथात विराजमान झालेली बाप्पांची मूर्ती, गणपती बाप्पा मोरया असा जयघोष.. फुले, गुलालाची उधळण, पारंपरिक वाद्यांसह संगीताच्या तालावर तल्लीन होऊन नाचणारी तरुणाई अशा उत्साह आणि जल्लोषपूर्ण वातावरणात गुरुवारी (दि़१२) नगरकरांनी लाडक्या गणरायांना पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत निरोप दिला़ मानाच्या विशाल गणपतीची गुरुवारी सकाळी नऊ वाजता जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याहस्ते उत्थापन पूजा होऊन मिरवणुकीला प्रारंभ झाला़ रामचंद्रखुंट ते आडतेबाजार, दाळमंडई, तेलीखुंट, कापड बाजार, अर्बन बँक रोड, नवीपेठ, खामकर चौक, चितळे रोड, चौपाटी कारंजा, दिल्लीगेटमार्गे नेप्ती नाक्याजवळील बाळाजीबुवा विहीर या मार्गाने मिरवणूक निघाली़ यंदा १४ मंडळे मिरवणुकीत सहभागी झाली होती़ यातील चार मंडळांनी ढोल-ताशा, लेझीम, बॅण्ड ही पारंपरिक वाद्य वाजविली तर दहा मंडळांनी सीडी साऊंड लावले होते़ त्याचा आवाज डिजे एव्हढा नसला तरी कानठळ्या बसविणारा नक्कीच होता़ जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील व उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ प्रत्येक मंडळासोबत पोलिसांच्या दोन तुकड्या चालत होत्या़ फिरते पथकही मिरवणुकीवर लक्ष ठेवून होते़ विसर्जनस्थळी व मिरवणूक मार्गावरील चौकाचौकात पोलीस तैनात होते़ रात्री बारा वाजले तेव्हा नियमानुसार पोलिसांनी मिरवणूक आहे त्या ठिकाणी बंद केली़ त्यानंतर मंडळांनी बाळाजीबुवा विहिरीत मूर्र्तींचे विसर्जन केले़ ं

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2024Ahmednagarअहमदनगर