शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

फटाके विक्रीवर बंदी; व्यापा-यांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 15:10 IST

अहमदनगर : नुकतीच सर्वोच्च न्यायालया ने दिल्लीत फटाकेबंदी केली. त्यानंतर मुंबई तसेच महाराष्ट्रातही फटाके बंदीची आतषबाजी करण्यात आली. या ...

ठळक मुद्देव्यापा-यांची भूमिका :आनंदाच्या क्षणीच फटाका वाजविला जातोआठ दिवसांवर दिवाळी आल्यानंतर ऐनवेळी निर्णय काफटाका व्यवसायातील रोजगाराचा विचार व्हावानिवासी भागात, मध्यवर्ती भागात बंदी आवश्यकसण, उत्सव पारंपरिक आणि पूर्वापार चालत आल्याने बंदी नको.

अहमदनगर : नुकतीच सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत फटाकेबंदी केली. त्यानंतर मुंबई तसेच महाराष्ट्रातही फटाके बंदीची आतषबाजी करण्यात आली. या निर्णयावर व महाराष्ट्र सरकारच्या फटाके बंदीच्या भूमिकेवर व्यापारी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.नगर शहरातील सर्वात मोठे फटाका मार्केट कल्याण रोडवर आहे़ फटाका मार्केटमधील व्यापा-यांनी सरकारच्या भूमिकेबाबत ‘लोकमत’कडे तीव्र नाराजी व्यक्त करीत ऐन दिवाळीत हा निर्णय घेणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. सार्वजनिक ठिकाणी, किराणा दुकानातून होणा-या फटाके विक्रीला अहमदनगरमधील व्यापारी संघटनेने विरोध दर्शविला असून, प्रशासनाने अशा फटाके विक्रीवर कारवाई करावी, असे आवाहन केले आहे. निवासी ठिकाणी फटाके विक्रीवर बंदी घालण्याशी सहमती दर्शविली आहे. मात्र, निवासी ठिकाणापासून दूर असलेल्या फटाके विक्रीवर बंदी घालणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

फटाके वाजल्यापासून नेमका काय त्रास होतोे याचा शोध घ्यावा. फटाक्याच्या ध्वनी प्रदूषणाचे प्रात्यक्षिक घ्यावे. फटाक्यासाठी १२५ डेसिबलची जरी मर्यादा आहे. प्रत्यक्षात ९५ डेसिबलपेक्षा जास्त एकाही फटाक्याचा आवाज येत नाही. त्यामुळे सरसकट बंदी चुकीची आहे. यामुळे व्यापारी वर्ग व ग्राहक यांच्यामध्ये संभम्र निर्माण झाला आहे. सर्वात जास्त प्रदूषण वाहनांमुळे होत आहे. त्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. आनंदाच्या क्षणी, सण उत्सवातच फटाके वाजविले जातात. त्यामुळे निर्णय योग्य म्हणता येणार नाही. मोठा व्यवसाय असल्याने अनेकांना या माध्यमातून रोजगारही मिळतो. यावर गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. निवासी भागातील फटाके विक्री बंदीचे आम्ही स्वागतच करतो. मात्र निवासी भाग कोणता याचे स्पष्टीकरण करावे. तसेच शहराच्या मध्यवस्तीत, लोकवस्तीतही बंदी असावी. बेकायदेशीर विक्रीवर प्रशासनाने कारवाई करावी. पारंपरिक सण असल्याने फटाक्यांची विक्री पूर्वापार सुरु आहे. त्यामुळे हा निर्णय चुकीचा आहे.- कैलास गिरवले, अध्यक्ष, अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशन

सध्या नोटाबंदी व जीएसटीमुळे मार्केट थंड आहे. फटाके बंदीच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील व्यापारी फटाके खरेदी करत नाहीत. ग्राहकही खरेदी करण्यास उत्सुक नाहीत. भारतीय संस्कृतीचा विचार करुन निर्णय घेणे गरजेचे आहे. पारंपरिक सण, उत्सव साजरा करण्यास विरोध कशासाठी केला जातो हे समजत नाही. फटाक्याव्यतिरिक्त इतर कारणांनी होणाºया प्रदूषणावर शासनाने विचार करण्याची गरज आहे. दिवाळी तोंडावर आल्यानंतर शासन बंदीबाबत संभम्र निर्माण करत आहे. सर्व बाबींचा विचार करुन शासनाने निर्णय घेण्याची गरज आहे.- गणेश क्षीरसागर

मी सोनईवरुन फटाके खरेदीला नगरच्या मार्केटमध्ये आलो आहे. मात्र फटाके बंदी नेमकी कुठे काय कशासाठी याबाबत मी संभ्रमावस्थेत आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी खरेदी करणार आहे. माझ्यासारखे ग्रामीण भागातील व्यापारी या निर्णयामुळे धास्तावले आहेत. सण उत्सवाच्या काळात केली जाणारी फटाके बंदी अन्यायकारक आहे. त्यामुळे शासनाने यावर विचार करुनच पुढील पावले उचलणे गरजेचे आहे. सरकारविरुध्द सर्वसामान्य लोक या निर्णयामुळे नाराज आहेत.- प्रकाश घावटे, सोनई ता. नेवासा