शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

पिचडांना जनताच धडा शिकविणार-बाळासाहेब थोरात; लहामटेंच्या प्रचारार्थ सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 16:41 IST

पुरोगामी विचाराच्या अकोले तालुक्याने आजवर पिचडांना साथ दिली. संगमनेरनेही त्यांना मदत केली. मात्र त्यांनी आपल्या मूळ विचाराशीच फारकत घेऊन भाजपत प्रवेश केला आहे. शरद पवारांशीही त्यांनी गद्दारी केली. त्यामुळे जनता आता फैसला करेल. संगमनेरचा पठार भाग पूर्ण ताकदिनीशी डॉ. किरण लहामटे यांच्यासोबत राहील, असे  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. 

अकोले : पुरोगामी विचाराच्या अकोले तालुक्याने आजवर पिचडांना साथ दिली. संगमनेरनेही त्यांना मदत केली. मात्र त्यांनी आपल्या मूळ विचाराशीच फारकत घेऊन भाजपत प्रवेश केला आहे. शरद पवारांशीही त्यांनी गद्दारी केली. त्यामुळे जनता आता फैसला करेल. संगमनेरचा पठार भाग पूर्ण ताकदिनीशी डॉ. किरण लहामटे यांच्यासोबत राहील, असे  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. किरण लहामटे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी गणोरे येथे थोरात यांनी सभा घेतली. जेष्ठ नागरिक विठोबा शिंदे अध्यक्षस्थानी होते. डॉ. लहामटे, अशोक भांगरे, कॉम्रेड डॉ. अजित नवले, बाजीराव दराडे, विनोद हांडे, अमित भांगरे यांची भाषणे झाली.थोरात म्हणाले, पठारभाग आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीमागे भक्कम उभा आहे. आढळा खोºयाने आतापर्यंत सतत पुरोगामी विचारांना साथ दिली. त्यामुळेही यावेळीही मतदार कॉंग्रेस आघाडीची साथ सोडणार नाही. अमित भांगरे म्हणाले, विखे यांचे अकोले तालुक्यात होणारे आक्रमण रोखण्यासाठी आम्ही तयार आहोत. तुम्ही आमच्या डोक्यावर हात ठेवा. तालुक्यातील तरुणाईने निवडणूक हातात घेतली असून डॉ. लहामटेच विजयी होतील. बाजीराव दराडे म्हणाले, बिताक्याचे पाणी देवठाण धरणाच्या लाभक्षेत्रात कधीच पोहचणार नाही. हा प्रकल्प माजी मंत्री पिचडांनीच तांत्रिकदृष्ट्या पूर्ण होऊ दिला नाही. शेतक-यांचे पाणी अडवणाºयांना जनता त्यांची जागा दाखवून देईल. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे, विनय सावंत, के. के. मोरे, विवेक शिंदे, प्रदिप भालेराव, अशोक आंबरे, तुषार शिंदे, मच्छिंद्र सोनवणे, पाटीलबुवा सावंत, सीताबाई पथवे, संपत नाईकवाडी, सुरेश खांडगे, बाळासाहेब नाईकवाडी, संदीप शेणकर उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019