शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

निळवंडेतून धरणातील एक थेंबसुद्धा पाणी देणार नाही - आमदार बाळासाहेब थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 18:10 IST

निळवंडे धरणातील एक थेंबसुद्धा पाणी लाभक्षेत्राबाहेर जाऊ दिले जाणार नाही. त्यामुळे या पाण्यावर कोणी हक्क सांगू नये, असा इशारा आमदार बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी दिला. तळेगाव दिघे ( ता.संगमनेर) येथील चौफुलीवर निळवंडे पाटपाणी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित रास्तारोको आंदोलनप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

ठळक मुद्देतळेगाव दिघे येथे रास्तारोको आंदोलन

तळेगाव दिघे: निळवंडे धरणातील एक थेंबसुद्धा पाणी लाभक्षेत्राबाहेर जाऊ दिले जाणार नाही. त्यामुळे या पाण्यावर कोणी हक्क सांगू नये, असा इशारा आमदार बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी दिला. तळेगाव दिघे ( ता.संगमनेर) येथील चौफुलीवर निळवंडे पाटपाणी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित रास्तारोको आंदोलनप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.थोरात म्हणाले, राज्यातील निळवंडे हे एकमेव असे धरण आहे की, ज्याचे काम पूर्ण होण्याअगोदर संपूर्ण प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आपण केले. आता पाण्यावर कुणीही राजकारण करू नये. अफवांवर विश्वास ठेऊ नका. मनातील किल्मिश काढून टाका. बाकी राहिलेले काम आपल्यालाच करावे लागणार आहे. पाण्यासाठी तुमच्याबरोबर कुठेही यायला मी तयार आहे?, असे आश्वासन थोरातांनी आंदोलकांना दिले. आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले, आमदार थोरात कधीही शेतकऱ्यांच्या हिताच्या आड आले नाहीत. निळवंडेच्या कामात कोणीही राजकारण आणू नये, असे आवाहनही त्यांनी केले.याप्रसंगी बाबा ओहळ, महेंद्र गोडगे, गणपत सांगळे, मच्छिंद्र दिघे, रमेश दिघे, राजेंद्र भडांगे, सरपंच बाबाजी कांदळकर, गणेश दिघे यांची यावेळी भाषणे झाली. आंदोलनात संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे, उपसभापती नवनाथ अरगडे, उपसरपंच अनिल कांदळकर, माजी जिल्हा परिषद सदस्या पद्मा थोरात, जे. डी. दिघे, हरिश चकोर, अविनाश सोनवणे, तुकाराम दिघे, हौशिराम सोनवणे, प्रभाकर कांदळकर हे प्रमुख नेते सहभागी झाले होते. निळवंडे लाभक्षेत्रातील शेतक-यांपेक्षा परिसरातील कार्यकर्तेच आंदोलनात मोठ्या प्रमाणात दिसत होते. आंदोलनस्थळी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील यांनी वाहतुकीचे योग्य नियोजन केल्यामुळे वाहतुकीस अडथळा आला नाही.पाणी पळविण्याचे षडयंत्रसंगमनेरचे प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, तहसीलदार साहेबराव सोनवणे व पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी आ.थोरातांच्या हस्ते निवेदन स्वीकारले. कालव्यांची कामे त्वरित सुरू करा, कोपरगाव, शिर्डी, राहाता शहरांसाठी पाणी पळविण्याचे षडयंत्र थांबवा अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. निवेदन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर