शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राहात्यात बहुजन आक्रोश मोर्चा

By admin | Updated: April 19, 2017 19:47 IST

शेतकऱ्यांना कर्ज माफी करावी, इव्हीएम मशीन बंद करा यासारख्या विविध मागण्यांसाठी बुधवारी राहाता येथे बहुजन क्रांती आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

आॅनलाइन लोकमतराहाता (अहमदनगर) दि़१९- शेतकऱ्यांना कर्ज माफी करावी, इव्हीएम मशीन बंद करा यासारख्या विविध मागण्यांसाठी बुधवारी राहाता येथे बहुजन क्रांती आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी तहसील कार्यालय घोषणांनी दणाणून सोडले. शेतकऱ्यांना कर्ज माफी करा , शेतमाल व दुधास हमी भाव द्या, निळवंडे कालव्याची कामे त्वरित करा,ईव्हीएम मशिन बंद करुन निवडणूक मतपत्रिकेवर घ्यावी यासारख्या तीस मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन केल्यानंतर राहाता शहरातून घोषणा देत तहसील कार्यालयात मोर्चा दाखल झाला. मोर्चेकऱ्यांनी तहसील परिसर घोषणा देत दणाणून सोडला. यावेळी मोर्चाला मार्गदर्शन करताना मोर्चाचे राज्य समन्वयक डॉ. अनिल माने म्हणाले की, आमच्या मागण्या संविधानिक आहेत. आमच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही सरकारकडे मोर्चाव्दारे आक्रोेश करीत आहोत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत सरकार विरोधात आमचा लढा सुरु राहील. गरज पडल्यास मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभे केले जाईल. भारतीय विद्यार्थी सेनेच्या विद्यार्थिनींनी निवेदन व संविधान प्रास्तविके चे वाचन केल्यानंतर प्रियंका म्हस्के, सुप्रिया मंतोडे ,नंदिनी मंतोडे यांच्या हस्ते मागण्यांचे निवेदन तहसीलदार राहुल कोताडे यांना देण्यात आले. यावेळी शांताराम उपाध्ये, सोमनाथ दरंदले, सुनील बोऱ्हाडे, राजेंद्र बर्डे, दत्ता गोरे, अनिल सोमवंशी, विनायक निकाळे, निलेश दुरगुडे, सचिव बनसोडे, संतोष रोहम, अनिल मंतोडे यांची भाषणे झाली.