शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

कोतूळमध्ये आयुर्वेदचे अनोखे ‘औषधालय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 11:17 IST

कोतूळ-ब्राम्हणवाडा रस्त्यावर विलासनगर या ठाकर वस्तीत यशवंत सुखदेव डोके या अवलियाने चक्क खडकावर पन्नासच्यावर अतिदुर्मिळ वनस्पतींचे संवर्धन करून आयुर्वेदाचे अनोखे ‘औषधालय’ उभारले आहे. 

मच्छिंद्र देशमुख कोतूळ : ब्राम्हणवाडा रस्त्यावर विलासनगर या ठाकर वस्तीत यशवंत सुखदेव डोके या अवलियाने चक्क खडकावर पन्नासच्यावर अतिदुर्मिळ वनस्पतींचे संवर्धन करून आयुर्वेदाचे अनोखे ‘औषधालय’ उभारले आहे.  यशवंत सुखदेव डोके यांचे कोतूळ- ब्राम्हणवाडा रस्त्यावर छोटेसे टुमदार घर. या रस्त्याने जाणारा वाटसरू इथे थांबतोच. तो भर उन्हाळ्यात हिरवेगार अंगण पाहून! डोके यांच्या कौलारू घरालगत चार गुंठे खडकाळ जमीन आहे. यावर त्यांनी पंधरा वर्षे थोडी थोडी माती टाकून जंगलातील अतिदुर्मिळ वनस्पतींचे रोपण केले. काही अकोले तालुक्यातील जंगलातून तर काही इतर जिल्ह्यातूनही जमा केल्या. त्यासाठी त्यांना पंधरा वर्षे हे काम करावे लागले. उन्हाळात प्यायलाही गावात पाणी नसते. याच गावात अकोले तालुक्यातील पहिला टँकर सुरू होतो. उन्हाळ्यात ही बाग टिकण्यासाठी त्यांनी खडकात दहा फूट खोल व वीस फूट लांब-रूंदीचे शेततळे खोदले. त्यात प्लास्टिक कागद टाकून पाणी साठवले. उन्हाळ्यात दररोज दहा मिनिटे बोअरवेल हजार लिटर पाणी देतो. त्यातून घर वापर व वनस्पती बाग जगवतात.   यशवंत डोके हे ठाकर समाजाचे असल्याने जंगलातील प्रत्येक वनस्पती व तिचे अनेक पिढ्यांकडून आलेले  गुणधर्म  त्यांना माहीत आहेत. विलासनगर हे  आयुर्वेदिक औषधांच्या बाबतीत सर्वदूर परिचित आहे.   साप, विंचू, कुत्रा चावल्यास तसेच शरीरात, काटा, काच, लोखंड गेल्यास, मोठी जखम, त्वचारोगावर विविध औषधे आलेल्या रूग्णांना देतात. या झाडांचे केले रोपणकाळी गुंज, नाग दवणा, नागवेल, समुद्रसेफ, मालती, शुगर (परदेशी वनस्पती) कळलावी, रघतरोडा, बडदा, बेहडा, रोही, सोनचाफा, रोहितका, निरगुडी, काटेसावर, कोरफड, मोळ, पांढरा जास्वंद, रायआवळा,गेळ, रान वांगी, रान तुळस, काळा धोतरा,  आडुळसा अशा अनेक वनस्पती त्यांच्या बागेत आहेत. तर खजूर, पपई, केळी, फणस, वैशिष्ट्यपूर्ण आंबे व विविध प्रकारच्या वेलवर्गीय,तसेच फुल झाडेही रेलचेल आहेत.