विविध रंग खडूने काढलेल्या या चित्रात विविधतेत मानवाचे कल्याण रेखाटले आहे. माणसाला जगण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी म्हणजे सूर्यप्रकाश, पाणी, प्राणवायू या आपल्याला निसर्गाकडून मिळत असतात. तसेच झाडे, फळे, भाज्याही निसर्गाचे देणं आहे. याची जाणीव माणसाला आता होऊ लागली आहे. या निसर्गाचे विशेषतः झाडांचे जतन व संवर्धन आपली जबाबदारी आहे. सध्याच्या कोरोना संकटकाळात प्रत्येकाने कोणती काळजी घ्यावी, काय करावे याचे चित्ररूपी प्रात्यक्षिक दाखवले आहे. आजच्या दैनंदिन जीवनशैलीत प्रत्येकाने विविध फळे व भाज्या यांचा आहारात वापर करावा, व्यायामाबरोबर प्राणायम करावा, विरंगुळा म्हणून मनाला आनंद देणारी कला जोपासावी, असा संदेश दिला आहे.
तसेच शासनाने दिलेल्या नियमांचे म्हणजे मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे, शारीरिक अंतर राखणे याचे काटेकोरपणे पालन करण्याचा संदेश दिला आहे. शासनाच्या लसीकरण मोहिमेला सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यावर कोरोना नाहीसा होऊन पुन्हा एकदा मानवी जीवनात निसर्गासारखे चैतन्य, उत्साह संचारेल व हे कोरोना संकट दूर होईल, असा विश्वास चित्रातून व्यक्त केला आहे.
-------
फोटो - १८दंडवते
चित्रकार हेमंत दंडवते यांनी कोरोना संकटकाळात ‘निसर्गाचं देणं व माझी जबाबदारी’ यासाठी निसर्ग चित्राच्या माध्यमातून संदेश दिला आहे.
180521\fb_img_1621306840691.jpg
चित्रकार हेमंत दंडवते यांनी कोरोना वरील उपाय योजना यासंदर्भात कल्पकतेने चित्र काढून जनजागृती केली आहे .