शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

अविनाश आदिकांचा आघाडी धर्माचा नारा; लहू कानडेंसाठी प्रचारसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 18:08 IST

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडी धर्माचे पालन करत असून काँग्रेस उमेदवार लहू कानडे हे विजयी होतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांनी व्यक्त केला. उपनगराध्यक्ष करण ससाणे यांची साथ घेण्यास विरोध नाही, असेही आदिक यांनी स्पष्ट केले. 

श्रीरामपूर : श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडी धर्माचे पालन करत असून काँग्रेस उमेदवार लहू कानडे हे विजयी होतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांनी व्यक्त केला. उपनगराध्यक्ष करण ससाणे यांची साथ घेण्यास विरोध नाही, असेही आदिक यांनी स्पष्ट केले. काँग्रेस उमेदवार कानडे यांच्या प्रचारार्थ स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित सभेत आदिक बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, उमेदवार लहू कानडे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, ज्ञानदेव वाफारे, अजित कदम, सुरेश निमसे, सबाजी गायकवाड, कैलास बोर्डे, लकी सेठी, अर्चना पानसरे, सुभाष राजुळे, भाऊ डाकले, मल्लू शिंदे, अ‍ॅड.समीन बागवान, कॉ.श्रीधर आदिक यावेळी उपस्थित होते.आदिक म्हणाले, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी माझ्यावर प्रचार समन्वयकाची जबाबदारी दिली. त्यामुळे मतदारसंघात येऊ शकलो नाही. मात्र तरीही उमेदवार कानडे व आमदार डॉ. तांबे यांच्या संपर्कात होतो. श्रीरामपूरला गोविंदराव आदिक, बॅरिस्टर रामराव आदिक यांसारख्या नेत्यांची परंपरा लाभली आहे. येथील जनता हुशार आहे. ते सलग तीन वेळा कुठल्याही लोकप्रतिनिधीला संधी देत नाहीत. काँग्रेसला कानडे यांच्या रुपाने उच्चशिक्षित व प्रशासकीय सेवेचा अनुभव असलेला उमेदवार मिळाला आहे. ते निश्चितच मतदारसंघाचे विकासाचे प्रश्न सोडवतील. मी त्यांच्या सोबत आहे. विरोधी उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांचा पराभव निश्चित आहे. त्यानंतर कांबळे हे शिवसेना व भाजप संघटनेतही दिसणार नाहीत.आमदार तांबे म्हणाले, कांबळे यांच्याकरीता लोकसभेला कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले. मात्र त्यांनी संधी देऊनही विश्वासघात करत पक्ष बदलला. मतदारसंघातील राहुरी तालुक्यातील ३२ गावांमध्ये विकासाचे प्रश्न रखडले आहेत. रस्त्यांचा प्रश्न अतिशय बिकट झाला आहे. कांबळे यांनी अनेक गावांमध्ये एक रुपयाही निधी दिलेला नाही. प्रचारादरम्यान अनेक गावांमध्ये लोक त्यांच्यावर टीका करत आहेत.लहू कानडे म्हणाले, श्रीरामपूर तालुका दुष्काळी यादी व पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहण्यास आमदार भाऊसाहेब कांबळे हेच जबाबदार आहेत. कांबळे यांनी विधानसभेत शब्दही काढला नाही. त्यांनी मतदारसंघाच्या प्रश्नावर सभागृह डोक्यावर घ्यायला हवे होते. ज्ञानदेव वाफारे यांनी लहू कानडे हे दिवंगत गोविंदराव आदिक यांचेच शिष्य असून त्यांच्या विचारांचा वारसा ते पुढे नेत असल्याचे सांगितले.यावेळी नगराध्यक्षा आदिक, सबाजी गायकवाड, कैलास, बोर्डे यांनी मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019