शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद - अहमदनगर महामार्गावरील वाहतूक वळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 11:39 IST

मराठा आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मागील वर्षी प्रवरासंगम येथील गोदावरी पुलावरून उडी मारून काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतली.

नेवासा : मराठा आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मागील वर्षी प्रवरासंगम येथील गोदावरी पुलावरून उडी मारून काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतली. या घटनेस मंगळवारी २३ जुलै रोजी एक वर्ष पुर्ण होत आहे. स्वर्गीय काकासाहेब शिंदे यांच्या वर्षश्रध्दानिमित्ताने गोदावरी पुलावर स्थळ पूजन, सामूहिक श्रद्धांजली तसेच जुने कायगाव (ता.गंगापूर) येथील घाटावर वृक्षारोपण व किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्यामुळे अहमदनगर-औरंगाबाद महामार्ग क्रमांक ६० या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे.कायगाव मध्ये वाहतुकीची कोंडी होवू नये यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. सकाळी ६ वाजेपासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत लागू राहणार असल्याचे औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात सांगितले.दरम्यान काकासाहेब यांच्या स्मृतीदिनानिमित्त मराठा क्रांती मोचार्चे समन्वयक आणि शिवप्रेमींनी सोमवारी रात्रीच कायगाव पुलाच्या सुरवातीलाच चबुतरा उभारत काकासाहेब शिंदे यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. गेल्यावर्षीच्या घटनेनंतर कायगाव पुलाचे नामकरण 'हुतात्मा काकासाहेब शिंदे सेतू' असे करण्यात आले आहे. नेवासा तालुक्यात नेवासा फाटा, खडका फाटा, प्रवरासंगम येथे ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून शिर्डी कडून औरंगाबाद कडे जाणा-या सर्व बस बंद ठेवण्यात आल्या आहे. तर नेवासा कडून औरंगाबादला जाणारी वाहने शेवंगावकडून वळविण्यात आली आहे.असा आहे बदलऔरंगाबादकडून अहमदनगर, पुणेकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने ही बिडकीन -पैठण - शेवगाव मार्गे जातील.अहमदनगर, पुणेकडून येणारी सर्व प्रकारची वाहने ही शेवगाव- पैठण -बीडकीन मार्गे औरंगाबादकडे जातील

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय