शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद पोलिसांची नगरच्या वाळू तस्करांवर कारवाई; श्रीरापुरात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 13:23 IST

श्रीरामपूर परिसरातून गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू वाहनांवर गुरुवारी रात्री औरंगाबाद पोलिसांनी त्यांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर कारवाई केली.

अहमदनगर : श्रीरामपूर परिसरातून गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू वाहनांवर गुरुवारी रात्री औरंगाबाद पोलिसांनी त्यांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर कारवाई केली. त्यामुळे श्रीरामपुरात आज सगळा उपसा बंद झाला आहे. या कारवाईमुळे नगरचे पोलीस व महसूल यंत्रणाही उघडी पडली आहे.नगर जिल्ह्यात श्रीरामपूर, कोपरगाव, राहुरी, संगमनेर, पारनेर या तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरु असताना येथील महसूल व पोलीस प्रशासन काहीही कारवाई करताना दिसत नाही. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हे महसूल विभागाचे मूळ काम दुर्लक्षित करुन महापालिकेत कर्मचाºयांची झाडाझडती घेत आहेत. जेथे वाळूचे अधिकृत ठेके दिले गेले तेथे जेसीबी, पोकलन मशीन लावून अमाप वाळू उपसली जात आहे. याबाबत जिल्हाधिकारी द्विवेदी यांना नागरिकांनी पुरावे पाठवूनही ते काहीच कारवाई करायला तयार नाहीत.श्रीरामपूर तालुक्यात नगर व औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमारेषेवरही अमाप उपसा सुरु आहे. ही वाळू औरंगाबादमध्ये जाते. रात्री वाळू उपसा करणारे जेसीबी, पोकलेन व वीस वाहने औरंगाबाद जिल्ह्यातील सहायक पोलीस अधीक्षक मुंडे यांनी पकडली आहेत. या कारवाईचा धसका घेऊन श्रीरामपुरातील वाळू उपसा शुक्रवारी सकाळपासून बंद आहे. जे काम औरंगाबाद पोलीस करु शकतात ते काम नगर पोलिसांना व येथील महसूल यंत्रणेला का जमत नाही? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. गुरुवारी स्वयंसेवी संस्थांनी जिल्हाधिका-यांना निवेदन दिल्यानंतरही राहुरी, संगमनेर तालुक्यातील वाळू उपसा थांबलेला नाही.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर