यानिमित्त साप्ताहिक शुभारंभ सोहळा १४ ते ३० मार्चदरम्यान सुरू राहणार असून सुवर्ण अलंकार खरेदीवर २५ टक्के सवलत आणि सुवर्ण अलंकाराच्या वजनाइतकी चांदी मोफत दिली जाणार आहे, अशी माहिती अमित आणि अनिल पोखरणा यांनी दिली.
सर्जेपुरा येथील साईदीप टॉवर्स येथे या भव्य सुवर्ण दालनाचा शुभारंभ होत आहे. शुभारंभ आमदार अरुण जगताप, ओमप्रकाश रांका या मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
या दालनात सर्व प्रकारच्या व्हरायटीज उपलब्ध असणार असून, ग्राहकांना हॉलमार्क प्रमाणित दागिने व मजुरीवर घसघशीत सवलत मिळणार असल्याने या संधीचा जास्तीत जास्त सुवर्णप्रेमींनी सुवर्ण खरेदीचा लाभ घेण्याचे आवाहन अमित पोखरणा यांनी केले आहे.
या दोन मजली दालनात सोने, चांदी, हिरे, रत्ने, चांदीची भांडी, मूर्तीसोबतच १ ग्रॅम ज्वेलरीसाठी स्वतंत्र काऊंटरची व्यवस्था ग्राहकांना उपलब्ध असणार आहे. सुवर्ण खरेदीकरिता ग्राहकांनी या भव्य दालनास भेट देण्याचे आवाहन अनिल पोखरणा यांनी केले आहे.
( तीन फोटो आहेत)