शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बालचित्रपट महोत्सवात ‘पप्पू की पगदंडी’ चिमुकल्यांचे आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 14:18 IST

लहान मुलांच्या भावविश्वाला साद घालणा-या ‘पप्पू की पगदंडी’ या बालचित्रपटाने उपस्थित बच्चे कंपनीची मने जिंकली.

अहमदनगर : लहान मुलांच्या भावविश्वाला साद घालणा-या ‘पप्पू की पगदंडी’ या बालचित्रपटाने उपस्थित बच्चे कंपनीची मने जिंकली. कोणतेही काम लहान मोठे नसते. प्रत्येकाने आपल्यातील कलागुणांना वाव देत त्याला पुढे आणले पाहिजे तसेच त्यातून चांगली निर्मिती झाली पाहिजे, असा संदेश देणा-या या चित्रपटाने या मुलांच्या मनाचा ठाव घेतला. बालदिनानिमित्त केंद्र सरकारची बालचित्र समिती आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित बालचित्रपट महोत्सवास कार्निवल माय सिनेमा येथे गुरूवारी प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, बालचित्र समितीचे प्रशासनिक अधिकारी राजेश गोहिल, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील, उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार उमेश पाटील, अभिनेते मोहनीराज गटणे, अभिनेते प्रकाश धोत्रे आदींच्या उपस्थितीत या बालचित्रपट महोत्सवाचे उद्घाटन झाले.महानगरपालिकेच्या विविध शाळांतील मुलामुलींची चित्रपट पाहण्यासाठीची उत्सुकता आणि चित्रपटगृहात प्रवेश केल्यानंतर चेह-यावर फुललेला आनंद बच्चेकंपनीच्या चेह-यावर दिसत होता. जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी बालदिनाच्या सगळ्या बच्चे कंपनीला शुभेच्छा देत जे जे आवडतं, ते मनापासून करण्याचा मोलाचा सल्ला दिला. बालचित्र समितीचे गोहिल यांनी मुलांच्या भावविश्वाला चांगले वळण देणारे आणि शिकवण देणारे चित्रपट बालचित्र समिती तयार करत असते. हे चित्रपट मुलांना नक्कीच आवडतील, असे सांगितले. अभिनेते गटणे यांनी मुलांनी त्यांच्या कलागुणांचा विकास करावा. अभ्यासासोबतच एका आवडीच्या कलाक्षेत्रात पारंगत व्हावे, असे सांगितले. अमोल बागूल यांनी सूत्रसंचालन केले. उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांनी आभार मानले. १९ नोव्हेंबरपर्यंत माय सिनेमा चित्रपटगृहात ‘पप्पू की पगदंडी’, आशा स्क्वेअर येथे ‘पिंटी का साबुण’ आणि ‘भागो भूत’, तर नाथगंगा (लोणी) येथे ‘बंडू बॉक्सर’ हे चित्रपट दाखवले जाणार आहेत. हे चित्रपट सकाळी ८ ते साडेदहा या वेळेत पाहता येणार आहेत. लहान मुलांसाठी प्रबोधन, प्रोत्साहन आणि जिज्ञासा जागृत करणारे आणि मनोरंजन करणारे चित्रपट मुलांना विनामूल्य पाहता येणार आहेत. यावेळी शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे, दिलीप थोरे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरchildren's dayबालदिन