शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

असरच्या आडून शिक्षण व्यवस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न; नगरमध्ये लोकमत चर्चासत्रात शिक्षकांनी उपस्थित केले प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 20:42 IST

शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी विविध सर्वेक्षण होत असताना त्रयस्त संस्थेकडून सर्वेक्षण करण्याची गरजच काय असा सवाल उपस्थित करत सरकार स्वत: खरुज दाखवित आहे. 

ठळक मुद्देअसर अहवालावरील अक्षेपविद्यार्थ्यांचे सर्वेक्षण शाळेबाहेर करणे चुकीचे, शंभर टक्के मुलांचे सर्वेक्षण नाहीसर्वेक्षण करणा-यांना पुरेसे ज्ञान नाही, शिक्षण व्यवस्थेला विश्वासात घेतले जात नाहीअहवालानुसार कोणत्याही उपाययोजना नाहीतप्रत्येकवेळी नकारात्मक अहवाल देणे, सकारात्मक बाजू दाखविली जात नाही

अहमदनगर : शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी विविध सर्वेक्षण होत असताना त्रयस्त संस्थेकडून सर्वेक्षण करण्याची गरजच काय असा सवाल उपस्थित करत सरकार स्वत: खरुज दाखवित आहे. असरच्या आडून राज्यातील शिक्षण व्यवस्थेला बदनाम करून खासगी करण्याचा डाव रचला जात असल्याचा सूर शिक्षकांनी आळवला.अ‍ॅन्युअल स्टेटस एज्युकेशन रिपोर्ट-२०१७ (असर)चा अहवाल नुकताच प्रकाशित झाला आहे. या अहवालाबाबत ‘लोकमत’तर्फे गुरुवारी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षकांनी यावेळी असर अहवालाची पोलखोल करत हे सर्वेक्षण अशास्त्रीय पध्दतीने केल्याचा आक्षेप नोंदविला. मुख्याध्यापक लक्ष्मण टिमकर, भास्कर नरसाळे, शिक्षक नेते संजय कळमकर आणि शिक्षण अधिकारी रमाकांत काठमोरे यांनी चर्चेत सहाभाग घेतला.असर संस्थेतर्फे सन २००५ पासून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे सर्वेक्षण करण्यात येते़ सर्वेक्षणाचा अहवाल सरकारला सादर होतो. सरकारकडून त्यावर उपाययोजना केल्या जातात, असे सांगितले जाते. मग गेल्या बारा वर्षांत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा का झाली नाही, असा सवालही शिक्षकांनी उपस्थित केला. याचाच अर्थ शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी सर्वेक्षण न करता केवळ दोष दाखवून शिक्षण व्यवस्थेला बदनाम करणे हा एकमेव उद्देश असल्याचे यावरून उघड होते. जर मुलांना लिहिता वाचता येत नाही, मग एसएससी बोर्डाचा निकाल ९९ टक्के कसा लागतो़ शिक्षण विभागाकडून १०० टक्के मुलांचे सर्वेक्षण केले जाते़ परंतु, असर कडून नमुन्यादाखल काही गावातील मुलांचे सर्वेक्षण होते़ त्यावरून सर्वच मुलांची गुणवत्ता ठरविली जाते़ ही पध्दतच मुळात चुकीची असेही शिक्षक म्हणाले़ विद्यार्थ्यांच्या ढासळत असलेल्या गुणवत्तेवर शिक्षकांनी प्रकाश टाकला. गुणवत्ता ढासळण्यास केवळ शिक्षकच जबाबदार आहे, असे चित्र रंगविले जात आहे. परंतु गुणवत्ता ढासळण्यास शिक्षकांपासून ते मंत्र्यांपर्यंत सर्वच जबाबदार आहेत. कारण शिक्षकांना मुलांना शिकविण्यासाठी वेळच मिळत नाही़ शिक्षकांचे शिकविण्याचे तास, इतर कामे, प्रशिक्षणे, यासारख्या कामांचे असरने सर्वेक्षण करावे. म्हणजे शिक्षकांचा सर्वाधिक वेळ खर्च होतो, याचा सर्वांनाच अंदाज येईल, असा सल्ला शिक्षकांनी असर संस्थेला दिला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर