शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण हटाव मोर्चादरम्यान  पाथर्डी तहसील जाळण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 13:29 IST

पाथर्डी शहरवासियांच्या वतीने काढण्यात आलेल्या  मोर्चाला समोरे जाण्यासाठी नगरपालिका, पोलीस, मह्सूल, सार्वजनिक बांधकाम, महामार्ग विभागाचे अधिकारी गैरहजर असल्याने संतप्त आंदोलकांनी तहसील कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न केला. 

ठळक मुद्दे तहसील कार्यालयासमोर, वसंतदादा विद्यालय ते जुन्या बस स्थानक तसेच शहरातून जाणाऱ्या महामार्गालगत तसेच आंबेडकर चौकापासून शेवगाव रोडवरील खुल्या जागेवर मोठ्या प्रमाणावर कच्ची तसेच सिमेंटची पक्की अतिक्रमणे करून टपऱ्या तसेच इमारती उभारण्यात आल्या.आठवडा भरापासून नव्याने झालेल्या अतिक्रमणामुळे संतप्त झालेल्या रस्त्यालगतच्या नागरिकांनी तसेच सर्व पक्षीय पदाधीकार्यानी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन केले.तहसीलदार नामदेव पाटील व पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी याच्यसह नगरपालिका मुख्याधिकारी,सार्वजनिक बांधकाम,महामार्ग विभागाचे अधिकारी गैरहजर असल्याने मोर्चेकरी संतप्त झाले. यावेळी येळी गावचे सरपंच संजय बडे यांनी पेट्रोल टाकून तहसील कार्यालयाचा दरवाजा पेटविण्या

पाथर्डी : शहरातील सार्वजनिक तसेच खाजगी जागेवरील अतिक्रमणे हटवण्याच्या मागणीसाठी पाथर्डी शहरवासियांच्या वतीने काढण्यात आलेल्या  मोर्चाला समोरे जाण्यासाठी नगरपालिका, पोलीस, मह्सूल, सार्वजनिक बांधकाम, महामार्ग विभागाचे अधिकारी गैरहजर असल्याने संतप्त आंदोलकांनी तहसील कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न केला. शहरात तहसील कार्यालयासमोर, वसंतदादा विद्यालय ते जुन्या बस स्थानक तसेच शहरातून जाणाऱ्या महामार्गालगत तसेच आंबेडकर चौकापासून शेवगाव रोडवरील खुल्या जागेवर मोठ्या प्रमाणावर कच्ची तसेच सिमेंटची पक्की अतिक्रमणे करून टपऱ्या तसेच इमारती उभारण्यात आल्या. परंतु अतिक्रमण हटवण्याची जबाबदारी असलेले महसूल,नगरपालिका,सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून कोणतीही दखल न घेतल्याने नागरिकांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागत असल्याने याच्या निषेधार्थ व आठवडा भरापासून नव्याने झालेल्या अतिक्रमणामुळे संतप्त झालेल्या रस्त्यालगतच्या नागरिकांनी तसेच सर्व पक्षीय पदाधीकार्यानी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन केले. यावेळी तहसीलदार नामदेव पाटील व पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी याच्यसह नगरपालिका मुख्याधिकारी,सार्वजनिक बांधकाम,महामार्ग विभागाचे अधिकारी गैरहजर असल्याने मोर्चेकरी संतप्त झाले. यावेळी येळी गावचे सरपंच संजय बडे यांनी पेट्रोल टाकून तहसील कार्यालयाचा दरवाजा पेटविण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर जावळे व हवालदार संजय आव्हाड तसेच इतर कर्मचाऱ्यांनी बडे यांच्या हातातील पेट्रोलची बाटली हिसकावून घेतली. त्यामुळे अनर्थ टळला. मोर्चाची माहिती मिळताच शेवगाव परिक्षेत्राचे पोलीस उपाधीक्षक संदीप जवळे यांनी घटना ठिकाणी धाव घेत मोर्चाकर्याना शांततेचे आवाहन करत सर्व विभागाच्या बैठक घेवून अतिक्रमण हटवन्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्याने मोर्चेकरयानी दुपारी चार वाजेपर्यंत तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी