शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

खडांबे येथे बँक लुटण्याचा प्रयत्न

By admin | Updated: August 11, 2016 01:12 IST

राहुरी : तालुक्यातील खडांबे खुर्द येथे बुधवारी दुपारी कोटक महेंद्रा बँक लुटण्याचा प्रयत्न तीन चोरट्यांनी केला़ कॅशिअरच्या तोंडावर स्प्रे मारून रक्कम लुटण्यात आली़

राहुरी : तालुक्यातील खडांबे खुर्द येथे बुधवारी दुपारी कोटक महेंद्रा बँक लुटण्याचा प्रयत्न तीन चोरट्यांनी केला़ कॅशिअरच्या तोंडावर स्प्रे मारून रक्कम लुटण्यात आली़ पळून गेलेल्या चोरट्यांचा पाठलाग गावकऱ्यांनी केला व एकास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले़ अन्य दोघे फरार झाले आहेत़ अटक केलेल्या चोरट्याकडून लुटीची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे़ राहुरी तालुक्यातील खडांबे येथे तीन वर्षापूर्वी कोटक महेंद्र्रा बँकेची शाखा सुरू करण्यात आली़ बुधवारी १० आॅगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास विना क्रमांकाच्या पल्सर मोटारसायकलवरून तीन जण बँकेसमोर आले़ त्यातील एक जण बँकेत गेला, अन्य दोघे रस्त्यावर थांबले़ बँकेत गेलेल्याने ‘तुम्ही मुलींची छेडछाड करता’ असा आरोप करीत शाखा व्यवस्थापक निखील भुतडा व कॅशिअर संतोष निकम यांच्या दिशेने मिरचीचा स्पे्र फवारला़ एक हजार व पाचशेच्या नोटा घेऊन चोरटा पळत असतांना कॅशिअर निकम यांनी त्याला आवळले़, मात्र तो हिसका देवून रोख रक्कम घेवून पळाला़ व्यवस्थापक निखील भुतडा यांनी चोरट्याचा पाठलाग केला़ त्यानंतर जवळच असलेल्या गिन्नी गावात दीपक पवार यांच्या शेतात चोरटा लपला़ माजी सरपंच बाळासाहेब लटके, अशोक शेळके, सुयोग पवार, सोमनाथ गायकवाड, अमृत शेळके, कान्हु ताकटे, पोलीस पाटील जयसिंग पवार यांनी पाठलाग करून चोरट्याला पकडले़ पोलीस तुपे हे राहुरीवरून वांबोरीकडे जात होते़ त्यांना घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी कुटे, मिसाळ यांना घटनेची माहिती देऊन बोलावून घेतले़ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली व एका चोरट्यास ताब्यात घेतले़ अन्य दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले़ बँक लूट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव किरण दुशिंग आहे़ त्याला जबरी चोरीच्या गुन्ह्यात पुणे पोलिसांनी पकडले होते़ काही दिवसांपूर्वी तो सुटला़ त्याच्याकडून लुटीची ५४ हजार रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली़ अन्य दोन आरोपींचा शोध सुरू असल्याचेही ते म्हणाले़