शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

२०२२ पर्यंत ‘निळवंडे’चे पाणी देण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:19 IST

संगमनेर : राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच दुसऱ्याच दिवसापासून निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामाला गती दिली. यंदाच्या अर्थसंकल्पात या ...

संगमनेर : राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच दुसऱ्याच दिवसापासून निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामाला गती दिली. यंदाच्या अर्थसंकल्पात या कालव्यांसाठी भरीव निधी मंजूर केला. अजूनही निधी उपलब्ध करून देत २०२२ पर्यंत दुष्काळी भागात निळवंडे धरणाचे पाणी कालव्यांद्वारे देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे, असे प्रतिपादन कॉँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

रविवारी (दि.२१) सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंत्री थोरात बोलत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सभा ऑनलाईन झाली. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. माधवराव कानवडे, महानंदाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे, शिवाजीराव थोरात, इंद्रजीत थोरात, अमित पंडित, शंकरराव खेमनर, अजय फटांगरे, नवनाथ अरगडे, गणपतराव सांगळे, साहेबराव गडाख, संपतराव डोंगरे, सुभाष सांगळे, भारत मुंगसे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.

कारखान्याचे संचालक चंद्रकांत कडलग, रमेश गुंजाळ, रोहिदास पवार, मीनानाथ वर्पे, इंद्रजीत खेमनर, संपत गोडगे, अभिजीत ढोले, भास्कर आरोटे, भाऊसाहेब शिंदे, डॉ. तुषार दिघे, माणिक यादव, दादासाहेब कुटे, विनोद हासे, अनिल काळे, मीरा वरपे, मंदा वाघ, किरण कानवडे, शंकर धमक, नानासाहेब शिंदे, राजेंद्र गुंजाळ, केशव दिघे, राजेंद्र कढणे आदी यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक कारखान्याचे अध्यक्ष ओहोळ यांनी केले. नोटीस वाचन कार्यकारी संचालक घुगरकर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. उपाध्यक्ष हासे यांनी आभार मानले.

...

१० लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप

५ हजार ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या साखर कारखाना व ३० मेगावॅट वीज निर्मितीचा प्रकल्प हे निर्णय अत्यंत दूरदृष्टीचे ठरले आहेत. चांगला पाऊस झाल्याने सर्वत्र ऊस जास्त प्रमाणात उपलब्ध आहे. कारखान्याने यंदाच्या हंगामात आतापर्यंत १० लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे. कारखान्याची वाटचाल चांगली असून अधिक कार्यक्षमतेने काम करताना हा लौकिक यापुढेही असाच राहील, असा विश्वासही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

...