शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

समविचारी संघटनांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 18:43 IST

चार वर्षे सत्ता काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करणाऱ्या मोदी सरकारच्या कारभाराविरुध्द बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर भाकपसह डावे पक्ष व सर्व समविचारी संघटनांच्या वतीने हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात असंतोष व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

ठळक मुद्देमोदी सरकारच्या कारभारावर टीका

अहमदनगर: चार वर्षे सत्ता काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करणाऱ्या मोदी सरकारच्या कारभाराविरुध्द बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर भाकपसह डावे पक्ष व सर्व समविचारी संघटनांच्या वतीने हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात असंतोष व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.भाजपच्या चार वर्षाच्या सत्ताकाळात त्यांनी कोणती चांगली कामे केली. याचा जाब विचारण्यासाठी देशव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यलया समोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाकपचे राज्य सह सचिव कॉ.सुभाष लांडे, कॉ.महेबुब सय्यद, कॉ.प्रशांत गायकवाड, कॉ.सुधीर टोकेकर, कॉ.बहिरनाथ वाकळे, कॉ.शंकर न्यालपेल्ली, कॉ. बाबा आरगडे, महादेव पालवे, लक्ष्मण नवले, शारदा बोगा, श्रीधर आदिक, भगवानराव गायकवाड, बापू राशीनकर, आप्पासाहेब वाबळे, अंबादास दौंड, पांडुरंग शिंदे, दिपक शिरसाठ, सतीश निमसे, लक्ष्मी कोडम, शोभा बिमन, विकास गेरंगे आदिंसह डावे पक्ष व सर्व समविचारी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.भाजपा सरकारने निवडणुकीच्या काळात काढलेल्या जाहिरनाम्यातील एकही आश्वासन पूर्ण केले नाही. प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करणार, दरवर्षी दोन कोटी रोजगार उपलब्ध करणार, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करणार, शेतकºयांची संपुर्ण कर्जमाफी करणार, राज्य भ्रष्टाचारमुक्त करणार, स्विस बँकेतील काळा पैसा भारतात आनणार आणि भारतातील जनतेसाठी अच्छे दिन आनणार अशी अनेक आश्वासने या सरकारने दिली होती. परंतू प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. फक्त भाजप व त्यांच्या आमदार, खासदार व मंत्र्यांनाच अच्छे दिन आल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला. 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय