शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे शिर्डीचे शहराध्यक्ष, माजी नगरसेवक यांच्यावर लोणीत प्राणघातक हल्ला

By शेखर पानसरे | Updated: January 3, 2024 14:45 IST

काँग्रेस पक्षाचे शिर्डीचे शहराध्यक्ष सचिन चौगुले आणि माजी नगरसेवक सुरेश आरणे यांच्यावर मंगळवारी (दि.०२) संध्याकाळी लोणी येथे प्राणघातक हल्ला करण्यात आला.

संगमनेर : काँग्रेस पक्षाचे शिर्डीचे शहराध्यक्ष सचिन चौगुले आणि माजी नगरसेवक सुरेश आरणे यांच्यावर मंगळवारी (दि.०२) संध्याकाळी लोणी येथे प्राणघातक हल्ला करण्यात आला. अज्ञात दहा-बारा जणांनी त्यांच्यावर केलेल्या हल्ल्यात मारहाण करताना गज, हॉकी स्टिक, चॉपरचा वापर केला. त्या दोघांनाही उपचारासाठी संगमनेरातील मेडिकव्हर हॉस्पिटल येथे आणण्यात आले, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असून रात्री उशिरा काँग्रेस विधिमंडळपक्षनेते, आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी त्यांची भेट घेऊन विचारपूस केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार हे एका कार्यक्रमानिमित्त संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रूक येथे आले होते. त्या कार्यक्रमासाठी शहराध्यक्ष चौगुले, माजी नगरसेवक आरणे हे उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते त्यांच्या कारमधून शिर्डी येथे जात होते. ते लोणी येथे पोहोचले असता पाच-सहा दुचाकींवरून आणि कारमधून आलेल्या अज्ञात दहा-बारा जणांनी चौगुले यांच्या कारची तोडफोड करण्यास सुरूवात केली. चौगुले यांच्यासह माजी नगरसेवक आरणे यांना कारच्या खाली ओढून दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यांना उपचारांसाठी तातडीने संगमनेरातील मेडिकव्हर हॉस्पिटल येथे आणण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.